शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ शासनात विलीन करा; मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:38 IST

राज्यभरातील सव्वालाख अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे.

ठळक मुद्देसव्वा लाख कामगारांचे हित जोपासा

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरातील सव्वालाख अधिकारी, कामगारांना चांगले दिवस यावे यासाठी एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करा, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घालण्यात आले आहे. महामंडळ केवळ कामगारांमुळे तोट्यात नाही. याची अनेक कारणे आहेत. याचा अभ्यास करून कामगारांचे हित जोपासले जावे. कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते दिल्यास ‘एसटी’ला चांगले दिवस येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना देण्यात आला.एसटी कामगारांना देशातील इतर राज्य परिवहन महामंडळ आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी वेतन आहे. यातून त्यांचा उदरनिर्वाहसुध्दा होत नाही. कौटुंबिक गरजा पूर्ण करणे कठीण झाले आहे. या कामगारांना सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या वेतनात वाढ आवश्यक आहे. यासाठी महामंडळ शासनात विलीन करणे गरजेचे आहे. सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना घोषित करावे.महामंडळाची आर्थिक स्थिती हलाखीची होण्यास कामगार जबाबदार नाही. सरकारी धोरण आणि महामंडळाची कामे बाहेरील संस्थांकडून करवून घेणे याशिवाय इतर कारणांमुळे एसटी तोट्यात आली आहे. खासगी शिवशाही किरायाने घेऊन प्रवासी वाहतूक महामंडळाच्या तोट्यातील मोठे कारण आहे. महामंडळाचे उत्पन्न वाढत नसल्याने कर्मचाºयांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नाही. एसटी महामंडळाला स्वतंत्र महामंडळ त्याचे स्वतंत्र अस्तीत्व न दाखविता राज्य शासनात विलिनीकरण करावे, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने म्हटले आहे.प्रवासी कराचा वाढता बोजामहाराष्ट्र सरकार राज्य परिवहन महामंडळाकडून एकूण १७.५ टक्के दराने प्रवासी कर वसूल करते. इतर राज्यात हा दर सात ते दहा टक्के आहे. देशात एसटीकडून सर्वाधिक कर महाराष्ट्रात घेतला जातो. महाराष्ट्र शासनाचा अंगिकृत व्यवसाय असतानाही एवढ्या मोठ्या कराचा भार महामंडळाला सहन करावा लागतो. एसटी महामंडळाचे सर्व निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनेच होतात. मात्र शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळत नाही. शासनाला उत्पन्न मिळवून देते, सोबतच स्वत:चाही खर्च भागविते. महामंडळ बळकट होण्यासाठी शासनात विलिनीकरण करा, असे साकडे संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून घातले आहे.महामंडळाला सुरक्षा कवच आणि कर्मचाºयांच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. समस्या मांडण्यासोबतच उपायही सूचविण्यात आले आहे.- हनुमंत ताटे,जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

टॅग्स :state transportएसटी