शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा संप, बाजार समितीत शुकशुकाट

By admin | Updated: July 24, 2016 00:40 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे.

एक टक्का अडतीवर खल : शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या, अडत्यांना भीती कराची यवतमाळ : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाविरोधात बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे तर, दुसरीकडे व्यापाऱ्यांनी एक टक्का अडत अडतदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. अडत्यांनी मात्र या वाटाघाटीस नकार दिला आहे. व्यापाऱ्यांच्या संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट आहे. शेतकरी हित साधत असल्याचा कांगावा करणाऱ्या बाजार समित्या सध्यातरी शेतकऱ्यांशी विरोधकांप्रमाणेच वागत आहेत. आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी बाजार समिती कधी सुरू होणार याची वाट पाहात आहे. मात्र गत अनेक दिवसांपासून मार्ग न निघाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. व्यापाऱ्यांकडून अडत वसुलीचा उल्लेख नवीन अध्यादेशात करण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडून अडत वसूल झाल्याने अडत्यांच्या पैशावर टॅक्सचा बोझा पडणार आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून अडत कापली जात होती. यामुळे अडत्यांना टॅक्स भरावा लागत नव्हता. आता व्यापाऱ्यांंकडून अडत कापली जाणार आहे. यामुळे अडतदारांच्या अडतवर टॅक्स लागणार आहे. यामुळे पूर्वी लपविली जाणारी धान्याची उलाढाल आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे. शासनाच्या तिजोरीतून चोरी जाणाऱ्या करालाही ब्रेक लागणार असून बाजार समितीमधील प्रत्यक्ष उलाढाल समोर येणार आहे. १३ लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्यास अडत्यांना सेवा कर भरावा लागणार आहे. या प्रमुख कारणाने व्यापारी आणि अडत्यांनी खरेदी थांबविली आहे. अडत न देण्याचे कारण व्यापारी आणि अडते पुढे करत आहे. या सर्व प्रकारात शेतकऱ्यांची मात्र कोडी होत आहे. (शहर वार्ताहर) एक रुपयाच का ? शेतकऱ्यांकडून १.७५ पैसे अडत वसूल केली जात होती. आता ही अडत एक रुपयाच करण्यात यावी, असा प्रस्ताव व्यापाऱ्यांनी अडत्यांपुढे ठेवला आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र असा निर्णय कधीही झाला नाही. दरात तफावत झाल्यास शेतमालाच्या एकूण किमतीत फरक पडेल. कमी अडत असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल. अधिक अडत घेणाऱ्या ठिकाणी कमी भाव मिळेल. यामुळे शेतमालास कमी दर मिळणाऱ्या बाजार समितीत येणारा शेतमाल थांबेल, असा धोका व्यापारी आणि अडत्यांना वाटत आहे. राज्यभरात सर्वच व्यापाऱ्यांनी एकच अडत ठेवावी. यामुळे शेतमालाच्या दरात कमी अधिक दराची तफावत निर्माण होण्याचा धोका आहे. सर्व बाजार समितीमधील व्यापारी आणि अडत्यांचा एकच निर्णय व्हावा म्हणून बैठका घेतल्या जात आहे.