शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

जिल्हा परिषद प्रशासनातील ‘चेंज’साठी सदस्य एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:07 IST

जिल्हा परिषदेच्या प्रशासनापुढे पदाधिकारी व सदस्यांनी हात टेकले आहे. या हतबल सदस्यांना प्रशासनात कोणत्याही परिस्थितीत चेंज हवा आहे.

ठळक मुद्देराजकीय अपयश : स्वाक्षरी मोहिमेतून दबाव वाढविण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्रशासनापुढे पदाधिकारी व सदस्यांनी हात टेकले आहे. या हतबल सदस्यांना प्रशासनात कोणत्याही परिस्थितीत चेंज हवा आहे. त्यासाठी दबाव निर्माण करता यावा म्हणून अविश्वास प्रस्तावासाठी स्वाक्षरी मोहिमेचे हत्त्यार उपसले गेले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सह्यांचा हा कागद ‘सरकार’च्या पुढे ठेवून प्रशासनातील चेंज करून घेण्याचा सदस्यांचा मनसुबा असल्याची माहिती आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाने एकत्र येत जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन केली. म्हणायला अध्यक्षपद काँग्रेसकडे असले तरी या सत्तेचा रिमोट भाजपाच्या हाती एकवटला आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक सभांमध्ये पदाधिकाºयांमधील अभ्यास व अनुभवाचा अभाव क्षणोक्षणी जाणवला. सदस्यांमध्येसुद्धा ही उणीव प्रचंड प्रमाणात आहे. अशा स्थितीत सर्व पदाधिकाºयांनी एकत्र बसून प्रशासनावर पकड निर्माण करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात प्रत्येक पदाधिकारी केवळ आपल्या खात्यापुरता विचार करीत असल्याने प्रशासनाला आपल्या सोयीने चालण्याची आयतीच संधी निर्माण झाली. त्यातूनच पदाधिकारी विरुद्ध प्रशासन असा बेबनाव निर्माण झाला. सभागृहाच्या व पदाधिकाºयांच्या निर्णयांना खो देणे, विलंबाने अंमलबजावणी करणे, नियम-कायद्याच्या अडचणी निर्माण करणे असे प्रकार सुरू झाले. त्यामुळे पदाधिकारी व सदस्य वैतागले आहेत. प्रशासन पूर्णत: नियमाने चालविले जात नाही, राजकीय सोयीने भूमिका बदलविल्या जातात, काही अभ्यासू सदस्यांवर राजकीय दबावाचे कारण पुढे करून विषय थंडबस्त्यात टाकण्यासाठी विनवणी केली जाते, असा प्रशासनाबाबत सूर आहे.विरोधी-सत्ताधारी एकत्रएकूणच भविष्यातही पदाधिकारी व प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण होण्याची चिन्हे नाहीत. एकतर आधीच जिल्हा परिषदेला रिक्त पदांनी ग्रासले आहे. अतिरिक्त प्रभारावर डोल्हारा चालविला जात आहे. वरिष्ठांना डावलून कनिष्ठांना प्रभारी बनविण्याचे प्रकारही घडले आहेत. प्रशासनाच्या भूमिकेबाबत विरोधी पक्षसुद्धा सत्ताधाºयांची बाजू घेताना दिसतो आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेत आता प्रशासनात चेंज मागितला जात आहे. त्यासाठी सदस्यांनी हातात हात घालून प्रशासनाच्याविरोधात अविश्वास दाखवित स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्यावर ४० स्वाक्षºया झाल्याचेही सांगितले जाते. मात्र, हा कागद आजतागायत जाहीररित्या कुणीच कुणाला दाखविला नसल्याने या स्वाक्षºयांबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. सत्ताधारीच नव्हे विरोधकही या स्वाक्षरीसाठी आग्रही आहे.राष्ट्रवादीतूनही नेत्यांचा शब्दराष्ट्रवादीत एक सदस्य वगळता इतरांच्या स्वाक्षऱ्या देण्याचा शब्द नेत्यांनी दिल्याचे बोलले जाते. काँग्रेसमधूनसुद्धा नेतृत्वच स्वाक्षरी देण्याच्या ‘सशर्त’ तयारीत आहे. त्याआड आपल्या क्षेत्रात सत्ताधाºयांकडून बराच विकास निधी नेण्याचेही नियोजन आहे. काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादीचा एक असे तीन सदस्य मात्र या स्वाक्षरी मोहिमेला जाहीररित्या विरोध करीत असल्याचे दिसते.अधिवेशनात दाखविणार स्वाक्षऱ्याप्रशासनाविरोधात सदस्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या, त्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्थानिक सत्ताधारी नेतृत्वामार्फत ‘सरकार’पुढे दाखवायच्या व त्याआड जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील चेंज करून घ्यायचा, असा राजकीय दबावाचा नवा नियोजित फंडा असल्याची माहिती आहे. आता त्यात खरोखरच कितपत यश येते, याकडे लक्ष लागले आहे. तर खुद्द प्रशासनाचीसुद्धा जिल्हा परिषदेचा कारभार पुढे चालविण्याची फारशी मानसिकता नसल्याचे सांगण्यात येते. भविष्यात प्रशासकीय चेंज झाल्यावर तरी जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत चालणार का? याकडे नजरा लागल्या आहे.सत्ता सोपवून प्रमुख नेत्यांचे दुर्लक्षजिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र सत्तेत बसण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सत्ता स्थापन झाली. मात्र, त्यानंतर या नेत्यांनी जिल्हा परिषदेकडे दुर्लक्ष केले. पदाधिकारी-सदस्य व प्रशासनात समन्वय नसल्याने टोकाची भूमिका घेतली जात असतानाही नेतेमंडळी ब्रसुद्धा काढण्यास तयार नाहीत. आता तर त्यांना या कामी जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षाचीही साथ लाभते आहे. प्रशासनावर अविश्वास आणण्याची पदाधिकाºयांवर आलेली ही वेळ म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांचे राजकीय अपयश मानले जात आहे.