शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

कचरा वेचणाऱ्या हातावर सजणार मेहंदी

By admin | Updated: September 30, 2016 02:52 IST

पाठीवर दप्तराऐवजी कचऱ्याचे पोते अन् हातात मिळेल तो कचरा. गल्लीबोळात कचरा वेचणाऱ्या या हातांवर सजणार आहे ती निकाहची मेहंदी.

बानू शेखचा २ आॅक्टोबरला निकाह : श्रमसाफल्याला जाकीरची आयुष्यभर साथयवतमाळ : पाठीवर दप्तराऐवजी कचऱ्याचे पोते अन् हातात मिळेल तो कचरा. गल्लीबोळात कचरा वेचणाऱ्या या हातांवर सजणार आहे ती निकाहची मेहंदी. बानूच्या श्रमसाफल्याला जाकीर आयुष्यभराची साथ देणार आहे. हा आगळावेगळा विवाह सोहळा गांधी जयंतीला २ आॅक्टोबर रोजी यवतमाळच्या श्री सत्यसाई क्रीडा रंजन सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत प्राचार्य डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी दिली. बानू शेख गफ्फार शेख शफी असे परिस्थितीशी झुंजणाऱ्या तरुणीचे नाव. वयाच्या तिसऱ्या वर्षी पितृछत्र हरविले. घरात आई आणि दीड वर्षाची बहीण. आई जिनात १६-१६ तास कष्ट उपसायची. त्यामुळे ती कायमची आजारी पडली. शाळेत जाण्याच्या वयात बानूच्या पाठीवर उपजीविकेसाठी कचऱ्याचे पोते आले. लेखणीऐवजी हाती आला तो गल्लीबोळातील केरकचरा. दररोज पहाटे यवतमाळच्या रस्त्यावर ती केरकचरा गोळा करीत राहिली. तिला साथ मिळत होती लहान बहीण शमाची. अशाच संघर्षमय जगण्यात डॉ.प्रकाश नंदूरकरांची साथ मिळाली. शिक्षण सुरू झाले. दोघीही बहिणी दहावी-बारावी पास झाल्या. यवतमाळातच नर्सिंगचे प्रशिक्षण झाले. बानू घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथे शासकीय सेवेत तर आईच्या प्रकृतीमुळे शमाने शासकीय नोकरी सोडली. अशा या बानूच्या हातावर गांधी जयंतीला निकाहची मेहंदी रंगणार आहे. यवतमाळ तालुक्यातील रूईवाई येथील जाकीर खान हा टेलरिंगचा व्यवसाय करणारा तरुण तिला आयुष्याची साथ देणार आहे. संघर्षातून वाट काढणाऱ्या बानूच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण येत आहे. हा आनंद सोहळा यवतमाळकर तेवढ्याच उत्साहाने पार पाडण्याच्या तयारीत आहे. तिच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आणि तिचा प्रेरणामयी जीवनपट समाजापुढे आणण्यासाठी यवतमाळात भव्य विवाह सोहळा आयोजित आहे. २ आॅक्टोबर रोजी १०.३० वाजता सत्यसाई क्रीडा रंजनगृहात हा विवाह सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ऊर्जा व पर्यटन मंत्री मदन येरावार, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष सुभाष राय, माजी आमदार पाशा पटेल, समाजसेवक शंकरबाबा पापळकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उपस्थित राहणार आहे. या विवाहासाठी समिती गठित करण्यात आली आहे. सामाजिक सद्भाव सोहळा पार पाडण्यासाठी अनेक हात आणि सामाजिक संघटना पुढे सरसावल्या असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले. (नगर प्रतिनिधी)