लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : एखाद्या मुस्लीमाने माथ्यावर टिळा लावणे अथवा मूर्ती वा छायाचित्राला हार घालणे किंवा एखाद्या मुस्लीमेतर हिंदू अथवा बहुजन बांधवाने टोपी अथवा दर्गाहवर चादर टाकणे म्हणजे दुरावा दूर करणे नव्हे. त्याला सांकेतिक दुरावा दूर करणे म्हटले जाऊ शकते. मात्र यामुळे वास्तविक दुरावा दूर होणार नाही, असे विचार नौशाद उस्मान यांनी व्यक्त केले.येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात ‘दुरावा दूर करू या’ या विषयावर ते बोलत होते. मंचावर मौलाना कलीम सिद्दीकी, जमाते इस्लामी हिंदचे जिल्हा संघटक अ. हकीम शेख, मुफ्ती इनामउल्ला खान, इतिहास संशोधक प्रेम हनवते, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे जाधव, माजी नगरसेवक सुधाकर लाहेवार, आत्माराम हापसे विराजमान होते. सर्वधर्म समभाव, भाषा, गैरसमज, एक दुसऱ्यांच्या धर्मग्रंथांच्या माहितीचा अभाव, ही दुराव्याची कारणे असल्याचे नौशाद यांनी सांगितले. हा दुरावा दूर करण्यासाठी माध्यमांवर विश्वास न ठेवता एक दुसऱ्यांच्या धर्माचा, धर्मग्रंथांचा, महापुरुषांचा अभ्यास करून गैरसमजुती दूर करण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली.खोटे बोलून दुरावा कमी होणार नाही. विविध धर्म व धर्मीयांमध्ये मतभेद आहेत. ते राहतील. परंतु ‘मनभेद’ असायला नको. आमच्यात ‘मतभेद’ असतानाही आम्ही एकोप्याने राहू शकतो. सत्य मांडल्याने दुरावा दूर होऊ शकतो, असा आशावाद नौशाद यांनी व्यक्त केला. मौलाना कलीम सिद्दीकी यांनी सुंदर, सहज, प्रभावी, विनंतीवजा हिंदी भाषेत इस्लामचा पारिचय करून दिला. कार्यक्रमाची सुरूवात कारी मुहंम्मद अली यांच्या कुरआन पठणाने झाली. मराठी भाषांतर फिरोज अन्सारी यांनी केले. संचालन प्रा. फारूक खान यांनी केले. आभार मुफ्ती इनाम यांनी मानले. सर्व मुस्लीम धार्मिक, सामाजिक संघटना व समाजबांधवांतर्फे आयोजित या कार्यक्रमाला पुरुष व महिला उपस्थित होत्या.
उमरखेडमध्ये ‘दुरावा दूर करू या’वर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:02 IST
एखाद्या मुस्लीमाने माथ्यावर टिळा लावणे अथवा मूर्ती वा छायाचित्राला हार घालणे किंवा एखाद्या मुस्लीमेतर हिंदू अथवा बहुजन बांधवाने टोपी अथवा दर्गाहवर चादर टाकणे म्हणजे दुरावा दूर करणे नव्हे. त्याला सांकेतिक दुरावा दूर करणे म्हटले जाऊ शकते.
उमरखेडमध्ये ‘दुरावा दूर करू या’वर सभा
ठळक मुद्देनौशाद यांचे विवेचन : सांकेतिक दुरावा नव्हे, तर वास्तविक दुरावा दूर व्हावा