शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’साठी आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:30 IST

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसहकार मंत्र्यांची उपस्थिती : तीन वर्षांपासून कामधेनू ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे म्हणून देवरा समितीच्या निर्देशानुसार ३0 जुलै रोजी मुंबईत सहकार, मदत व पुनर्वसन विभागातर्फे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीला सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, प्रादेशिक संचालक (साखर) अमरावती, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, वसंत सहकारी साखर कारखाना तथा विषयाशी सबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. सहकार मंत्री देशमुख यांनीच याबाबतचे पत्र २५ जुलैला निर्गमीत केले. विदर्भातील सहकार क्षेत्रातील एकमेव पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. कारखान्याकडे १00 कोटींच्यावर कर्ज, कर्मचाऱ्यांचे वेतन, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे देणे बाकी आहे. अनेक वर्षांपूर्वीच कारखाना आर्थिकदृष्ट्या डबघाईस आला होता. गेल्या तीन वर्षात दोनदा कारखान्याचे अध्यक्षसुद्धा संचालक मंडळाने बदलले. तरीही कारखान्यास उर्जीतावस्था प्राप्त झाली नाही.कारखाना सुरु करण्यास प्रयत्न तोकडे पडल्याने शेतकरी, कर्मचारी, त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय यांचे हाल सुरू आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. शेतकरी, मजूर व कर्मचाºयांची कामधेनू पूर्ववत सुरु व्हावी, यासाठी, शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे डबघाईस येऊन बंद पडलेल्या कारखान्याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने देवरा समितीची स्थापना केली.देवरा समितीच्या निर्देशानुसार कारखान्याला अर्थसहाय्य मिळावे म्हणून सहकार विभागाने ३० जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील दालनात ही बैठक होणार आहे.पाच तालुक्यातील शेतकरी, मजूर संकटातगेलया तीन वर्षांपासून ‘वसंत’ बंद असल्याने पाच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, मजूर, कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहे. पाचही तालुक्यासाठी हा कारखाना कामधेनू ठरला होता. मात्र तीन वर्षांपासून बंद असल्याने आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे मुंबई होणाºया बैठकीकडे पाचही तालुक्यातील सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.