शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

दिग्गज नेत्यांच्या सभाही ठरल्या निष्प्रभ

By admin | Updated: May 21, 2014 00:00 IST

यवतमाळ प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्याची एक सभाही निवडणूक निकालाचे चित्र बदलवू शकते. अनेक दिग्गजांच्या सभांनी असा करिश्मा केल्याची अनेक उदाहरणे आहेत.

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ प्रचाराच्या रणधुमाळीत नेत्याची एक सभाही निवडणूक निकालाचे चित्र बदलवू शकते. अनेक दिग्गजांच्या सभांनी असा करिश्मा केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र यवतमाळात झालेल्या दिग्गजांच्या सभांनीही उमेदवारांचा भ्रमनिरास केला. राहुल गांधी आणि राज ठाकरे यांची सभाही मतदारांचे मत परिवर्तन करण्यात अपयशी ठरल्याचेच दिसत आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे, भारिप बमसंचे प्रकाश आंबेडकर, आम आदमी पार्टीच्या मेधा पाटकर आदींच्या सभा झाल्या. मात्र उद्धव ठाकरे यांची सभा वगळता कुणाचाही फारसा प्रभाव मतदारांवर पडल्याचे निवडणूक निकालानंतर दिसले नाही. काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव मोघे यांच्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ४ एप्रिलला सभा झाली. पोस्टल मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली. भर दुपारी सभा असल्याने अर्ध्या अधिक मैदानावर मंडपही टाकण्यात आला. मात्र ऐन वेळेपर्यंत गर्दी जमायलाच तयार नव्हती. विमानतळावर राहुल गांधींचे विमान आले. परंतु इकडे गर्दी नव्हती. त्यामुळे तब्बल तासभर त्यांना तेथेच चर्चेच्या नावाखाली थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर राहुल गांधींनी केलेल्या मार्गदर्शनाचाही मतदारांवर फारसा प्रभाव पडल्याचे दिसले नाही. ७ एप्रिल रोजी मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्यासाठी राज ठाकरे यांची सभा झाली. स्वयंस्फूर्तीने पोस्टल मैदानावर राज ठाकरेंना ऐकण्यासाठी गर्दी झाली. राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु राज ठाकरेंची सभाही राजू पाटील राजे यांची अनामत वाचवू शकली नाही. प्रकाश आंबेडकरांची पोस्टल मैदानावरील सभा जातीय मतांचे ध्रुवीकरण करेल, असे वाटत होते. परंतु मतदारांनी जात-पात बाजूला सारल्याचे भारिप बमसंच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांवरून सिद्ध होते. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची नेरमधील सभाही आपच्या नरेश राठोड यांना मते मिळवून देण्यात अपयशी ठरली. एकाच मैदानावर लागोपाट झालेल्या तीन दिग्गजांच्या सभेतील उद्धव ठाकरे यांचीच सभाच मतदारांना आकर्षित करू शकली, असे आता म्हणावे लागेल. त्यांच्या सभेला मोठी गर्दीही झाली होती. निवडणूक निकालानंतर भावना गवळींना मिळालेली मतांची आघाडी या सभेशी अनेकजण जोडतीलही. मात्र मोदी लाट आणि काँग्रेसबद्दलचा असंतोष मतदान यंत्रातून दिसून आला. तसे पाहता आता कुणा एका नेत्याच्या भाषणाने भुरळून जाण्याइतपत मतदार खुळे राहिले नाही. पूर्वी एखादी सभाही विजयाचे समीकरण बिघडवायची. मात्र आता तसे दिवस राहिले नाही. परंतु सभांची गर्दी आणि त्यातून होणारे मतपरिवर्तन हा नेहमी संशोधनाचच विषय राहिला आहे.