शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:29 IST

जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची सभा येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात पार पडली. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आप्पासाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर लाभले होते.

ठळक मुद्देकार्यकारिणी जाहीर : पंकज नानवाणी जिल्हाध्यक्ष, सचिव संजय बुरले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेची सभा येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात पार पडली. संघटनेचे अखिल भारतीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष आमदार आप्पासाहेब शिंदे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर लाभले होते. यावेळी संघटनेची नवीन जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. अध्यक्षपदी पंकज नानवाणी, सचिव संजय बुरले, तर कोषाध्यक्ष म्हणून गजानन बट्टावार यांची निवड झाली आहे.यावेळी ना. हंसराज अहीर यांचा सत्कार करण्यात आला. केमिस्टांनी आता औषधी व्यवसायासोबतच पंतप्रधानांनी राबविलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून यावेळी केले.अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब शिंदे यांनी विविध विषयांवर माहिती दिली. यापुढे केमिस्टांनी एमएसटीसी अंतर्गत एज्यूकेशनल कोर्सेस करून जगातील ग्लोबल स्पर्धेसाठी संघटनेच्या एम+एम (मेडिसीन प्लस मोअर) या आॅर्गनाईज रिटेल शॉपीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राचे मानद सचिव अनिल नावंदर यांनी प्रत्येक केमिस्टनी स्वत:ला अपग्रेड करून ग्राहकांना औषधांव्यतिरिक्त मूल्यवर्धित सेवा पुरविण्यावर भर दिला.यावेळी मंचावर महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद दुबे, अरुण बरकसे, कोषाध्यक्ष वैजनाथ जागुंष्टे, सहसचिव प्रसाद दानवे, अखिल भारतीय सदस्य रमण अग्रवाल, अमरावती झोन अध्यक्ष संजय पिंपळखुटे, पंकज नानवाणी, संजय बुरले, गजानन बट्टावार, राजू कोटलवार आदी उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक संजय पिंपळखुटे, संचालन अतुल ढोले व प्रसाद चौधरी यांनी केले.कार्यक्रमासाठी श्रीकांत खडतकर, दीपक बोरा, अनुप किन्हीकर, अविनाश फरकुंडे, सुधीर वाधवाणी, जेठानंद जेसवानी, ओमेश हातगावकर, दीपक कोकाटे, पंकज जन्नावार, धीरज जयस्वाल आदींनी पुढाकार घेतला.पदाधिकारी नियुक्तजिल्हा अध्यक्ष पंकज नानवाणी, सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार, उपाध्यक्ष अतुल ढोले, सुनील हरसुलकर. यवतमाळ शहर अध्यक्ष श्रीकांत खडतकर, सचिव प्रसाद चौधरी.