शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मीरा ठाकरे यांना मायबोली सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 21:41 IST

कविवर्य शंकर बडे स्मृती मायबोली सन्मान पुरस्कार मीराताई ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने येथे महेश भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्रकाश जोशी होते. प्रमुख वक्त्या म्हणून राजश्री हेमंत पाटील लाभल्या होत्या.

ठळक मुद्देशंकर बडे स्मृतिदिन : गोतावळ्याच्यावतीने आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कविवर्य शंकर बडे स्मृती मायबोली सन्मान पुरस्कार मीराताई ठाकरे यांना प्रदान करण्यात आला. शंकर बडे गोतावळ्याच्यावतीने येथे महेश भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी प्रकाश जोशी होते. प्रमुख वक्त्या म्हणून राजश्री हेमंत पाटील लाभल्या होत्या.मीराताई ठाकरे या विदर्भाच्या बहिणाबाई म्हणून प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेत काव्यरचना करून स्वत: गायणाने काव्य सादर करणाऱ्या मीराताई या शंकर बड्या यांच्या काव्यांच्या उत्तराधिकारी म्हणून ओळखल्या जातात. सत्कार प्रसंगी त्यांनी अनेक वऱ्हाडी कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी शंकर बडे यांच्या सहधर्मचारिणी कौसल्याबाई बडे विचारपीठावर उपस्थित होत्या.याप्रसंगी राजश्री हेमंत पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन नितीन पखाले, प्रास्ताविक विवेक कवठेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ताराचंद कंठाळे यांनी करून दिला. मानपत्राचे लेखन विवेक कवठेकर यांचे होते तर वाचन जीवन कडू यांनी केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात शंकर बडे यांच्या काव्य गायनाचा कार्यक्रम झाला. अंजली सरूळकर, दत्तात्रय देशपांडे, गजानन बडे, जयंत चावरे आदींनी यात सहभाग घेतला. यावेळी प्रामुख्याने माधवराव कैपिल्यवार, बाळासाहेब सरोदे, प्राचार्य शंकरराव सागळे, प्रा.डॉ. विवेक देशमुख, बाळासाहेब वगारे, प्रा. दिनकर वानखेडे, जयंत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.‘गोतावळ्याची गंगाजळी’यवतमाळातील पेशवे प्लॉट ते महादेव मंदिर या रोडला शंकर बडे यांचे नाव देण्याचा ठराव नगरपरिषदेने गतवर्षी मंजूर केला. त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यासाठी ‘गोतावळ्याची गंगाजळी’ स्थापन करून संयुक्त खात्यात पैसे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. कमी पडणारा निधी आमची संस्था देईल, असे आश्वासन राजश्री पाटील यांनी यावेळी दिले.