शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

वैद्यकीय अधिकारी तीन वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर

By admin | Updated: August 14, 2015 02:45 IST

तीन वर्षांपूर्वी वडगाव (जंगल) प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रतीनियुक्तीवर पाठविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी घारफळ येथून अद्यापही परत आलेले नाही.

अकोलाबाजार : तीन वर्षांपूर्वी वडगाव (जंगल) प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रतीनियुक्तीवर पाठविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी घारफळ येथून अद्यापही परत आलेले नाही. त्यामुळे येथील आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे.वैद्यकीय अधिकारी आपली सेवा घरफळला देत आहेत. मात्र मासिक पगार वडगाव येथून उचलण्यात येत आहे. परिसरातील तब्बल ४० खेड्यांतील रुग्णांना त्यांची सेवा मिळत नसल्याने रुग्णांमध्ये त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे.यवतमाळ तालुक्यातील वडगाव (जंगल) प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तीन वर्षांपूर्वी वैद्यकीय अधिकारी डॉ. वसुधा डेहणकर या कार्यरत होत्या. त्यांची आॅगस्ट २०१२ मध्ये येथून घारफळ आरोग्य केंद्रात प्रतीनियुक्ती करण्यात आली होती. तात्पुरत्या प्रतीनियुक्तीवर गेलेल्या वैद्यकीय अधिकारी तेव्हापासून वडगाव आरोग्य केंद्रात अद्यापही परतल्याच नाही. वडगाव आरोग्य केंद्राअंतर्गत दहा उपकेंद्र आहेत. परिसरातील ४० गावांतील ४५ ते ५० हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी या आरोग्य केंद्राची आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तात्पुरती प्रतीनियुक्ती बाभूळगाव तालुक्यातील घारफळ येथे करण्यात आली असल्याचे समजते. परंतु, त्या घारफळ येथील आरोग्य केंद्रावर जातात की नाही, अशी शंका येथील नागरिकांना आहे. परंतु, त्यांचा पगार मात्र न चुकता वडगाव येथील आरोग्य केंद्रातून निघत आहे.डॉ. डेहणकर यांची नियुक्ती वडगाव येथे असल्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या वैद्यकीय अधिकारी येथे परत न आल्यामुळे त्यांची रुग्णसेवा मात्र मिळत नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये रोष पसरत आहे. हा सर्व प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येऊनही त्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या नियमानुसार आता प्रतीनियुक्ती करता येत नाही. त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन वर्षांपूर्वी तात्पुरती केलेली प्रतीनियुक्ती रद्द करण्यात यावी व येथील आरोग्य केंद्राला वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच मागील सात वर्षांपासून आरोग्य सेविका व लिपिकाचे पदही रिक्त आहे. आरोग्य केंद्राची रुग्णसेवा सुरळीत होण्याकरिता रिक्त पदे भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)