शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या भेटीत वैद्यकीय अधिकारी गैरहजर

By admin | Updated: November 29, 2014 02:24 IST

पुसद तालुक्यातील माळपठार भागातील फेट्रा आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट दिली असता सर्व वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले.

बेलोरा : पुसद तालुक्यातील माळपठार भागातील फेट्रा आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद अध्यक्षांनी भेट दिली असता सर्व वैद्यकीय अधिकारी गैरहजर आढळून आले. यावरून या आरोग्य केंद्राच्या कारभाराचा नमुना पुढे आला. माळपठार भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या वारंवार तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या. परंतु अद्याप कुणीही त्याची दखल घेतली नव्हती. बेलोरा गटाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. आरती फुफाटे यांनी फेट्रा आरोग्य केंद्राला अकस्मात भेट दिली. तज्ज्ञ डॉक्टर असलेल्या डॉ. फुफाटे यांनी आरोग्य केंद्राची परिस्थिती बघितली. तब्बल एक तास थांबूनही त्यांना दवाखान्यात डॉक्टरच काय परिचरही आढळून आला नाही. विशेष म्हणजे मुख्य दरवाजाही अध्यक्षांनाच उघडावा लागला. जिल्हा परिषद अध्यक्षांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.डॉ. फुफाटे यांनी आरोग्य केंद्रातील रजिस्टरवर शेरा लिहून संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्याबाबीवर जिल्हा परिषदे अध्यक्षांच्या भेटीने शिक्कामोर्तब झाले. या भेटीने आरोग्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)