शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

मेडिकलचे डॉक्टर... संवेदनहीन अन् हृदयशून्यही

By admin | Updated: October 3, 2015 02:15 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वेदनेने तडफडत असलेल्या रुग्णाला असभ्य भाषेत हुसकावण्याचा प्रकार नवीन नाही.

असभ्य वर्तणुकीचे प्रकरण : संवेदनहीन मृतदेहाला सचेत समजून प्रशिक्षण घेणारे साधे सौजन्यही विसरतातलोकमत विशेषसुरेंद्र राऊत यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वेदनेने तडफडत असलेल्या रुग्णाला असभ्य भाषेत हुसकावण्याचा प्रकार नवीन नाही. बुधवारी रात्री झालेल्या घटनेने याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करणाऱ्या पोलिसांचे कौतुक तर सोडाच उलट त्यांनाच ‘नॉनसेंस’ म्हणत त्यांचा जाहीर पाणउतारा करण्यात आला. यात भरीसभर म्हणजे अधिष्ठातांनीसुध्दा आपल्या डॉक्टरची पाठराखण केली. यावरून रुग्णालय प्रशासनाच्या संवेदना बोथट झाल्याची प्रचिती येते. भळभळणारी जखम घेऊन वेदनेने विव्हळणारे रुग्ण, जीवाच्या आकांताने धावपळ करणारे त्यांचे नातेवाईक, या बाबी वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेसाठी नवीन नाही. वैद्यकीय शिक्षण घेताना डॉक्टर मानवी मृतदेहावरच उपचाराचा सराव करतात. त्या संवेदनाहीन देहाला सचेत समजून हळुवार पणे हा वर्ग चेतना देण्याचा प्रयत्न करतो. मात्र हाच विद्यार्थी पदवी घेऊन डॉक्टर झाल्यानंतर उपचार तर सोडाच साधे बोलण्याचेही सौजन्य दाखवित नाही. समाजातील साधनसुचितेच्या वर्गात मोडणारे वैद्यकीय क्षेत्र अशाच संवेदनहीन डॉक्टरांमुळे बदनाम होत आहे.शास्त्राने सुध्दा हे मान्य केले आहे की, रुग्णावर कोण उपचार करतो यापेक्षा तो कसा केला जातो याला अधिक महत्व आहे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कक्षसेवक यांच्याकडून दिलासा देणारे चार शब्द रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांच्या कानावर पडले तर उच्च कोटीच्या पेनकिलरपेक्षाही ते अधिक प्रभावी ठरतात. दुर्दैवाने ही गोष्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालातून लोप पावत चालली आहे. महाविद्यालय परिसरात कर्तव्यावर येत असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने पोलीस पेट्रोलींगमुळे अनर्थ टळला. पोलिसांनी लागलीच आरोपींना अटक केली. गुुन्हे दाखल करण्यासाठी पिडीत डॉक्टरची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याशी असभ्य भाषेचा वापर करण्यात आला. प्रशिक्षणार्थी डॉक्टरची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिसांना तब्बल एक ते दीड तास प्रतीक्षा करावी लागली. तेथे सर्वसामान्य रुग्णाला कोणत्या पध्दतीची सेवा मिळत असेल याची कल्पनाच न केलेली बरी. याही पेक्षा धक्कादाय बाब म्हणजे असभ्य भाषेत पोलिसांनी तुमचे डॉक्टर बोलले, अशी माहिती ठाणेदार मुकुंद यांनी अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांना दिली असता त्यांनी सुध्दा डॉक्टरच्या अरेरावीचे वेगळ्या पध्दतीने समर्थनच केले. महाविद्यालयाचा प्रमुुुखाचीच संवेदना बोथट असल्याने इतरांचे काय असा प्रश्न आहे. महाविद्यालयाच्या इतिहासात एखाद्या अधिष्ठाता विरोधात साना दाखल झाल्याची ही पहिलीच घटना आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर व अधिकारी वर्गाना सर्वप्रथम आलेल्या रुग्णांशी सौजन्याने कसे वागावे याचेच प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने गोरगरीब रुग्णांना येथे योग्य उपचार मिळतील. तक्रार देण्यासाठी एकत्र येणारे उपचारासाठी का येत नाही ?दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर अपघात झाला म्हणून एका माजी सैनिकाने जखमी व्यक्तीला उचलून रुग्णालयात आणले. तेथे आणल्यानंतर साधे स्ट्रेचर त्याला उपलब्ध करून देण्यात आले नाही. माझी ड्यूटी नाही म्हणून उपस्थित असलेला एकही कर्मचारी मदतीसाठी पुढे आला नाही. शेवटी संतापलेल्या त्या व्यक्तीने इथे कोण आहे अशी विचारणा केली, तर त्यालाच शिवीगाळ करण्यात आली. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. मदतीसाठी धावून आलेल्या त्या सदगृहस्था विरोधातच शहर ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रार देण्यासाठी एकत्र येण्याची तत्परता येथील कर्मचाऱ्यांनी दाखवितात. ही संवेदनहीनता यंत्रणेत का, आणि कोठून आली, याचा उलगडा बुधवारी रात्री झालेल्या घटनेतून झाला.