शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

घनकचरा, पाणी टंचाईवर उपाययोजना

By admin | Updated: April 1, 2015 02:10 IST

शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.

वणी : शहरातील घनकचरा व पाणी टंचाईची समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने उपायोजना सुरू केल्या.उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याची टंचाई जाणवते. चार वर्षांपूर्वी तर येथे भीषण दुष्काळात नागरिक पोळले होते. ही समस्या लक्षात घेऊन नगरपरिषदेने तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाच ट्युबवेलचा प्रस्ताव पाठविला होता. त्यातील दोन ट्युबवेल नामंजूर झाल्या, तर तीन मंजूर झाल्या आहेत. सोमवारी वामनघाट येथे या ट्युबवेल खोदण्याचे काम सुरू झाले. जॅकवेल परिसरात दोन व गणेशपूर घाटावर एक, अशा तीन नवीन ट्युबवेलला आता सुरूवात झाली आहे. शहराची जीवनदायीनी असलेली निर्गुडा नदी पूर्णत: आटली. त्यामुळे आत्तापर्यंत तिनदा नवरगाव धरणाचे पाणी नदीत सोडण्यात आले. आरक्षित पाणी व नवरगाव धरणाच्या पाण्याचा साठा बघता, हे पाणी फार काळ पुरणार नसल्याने वणीकरांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषद विविध उपाययोजना करीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष प्रिया लभाने यांनी दिली आहे. सोबतच घनकचरा ही सर्वात मोठी समस्या आहे. त्यावर नगरपरिषदेने सन २0१0 मध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला. मात्र काही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कलम ३०८ नुसार अपिल केल्याने हे काम रखडले होते. आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके, नगराध्यक्ष प्रिया लभाने, उपाध्यक्ष अशोक बुरडकर, बांधकाम सभापती इंदिरा पारखी, जलपूर्ती सभापती कीर्ती देशकर, मुख्याध्याधिकारी गोपिचंद पवार, अभियंता गायकवाड, देशमुख यांनी सोमवारी जागेची पाहणी केली. तेथे घनकचऱ्यापासून गांडूळ खताची निर्मिती व ओला-सुका कचऱ्याच्या व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील घनकचऱ्याची समस्या सुटून नगरपरिषदेच्या तिजोरीतही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. पाणी टंचाई व घनकचऱ्याच्या कामाला सुरूवात झाल्याने महत्वाच्या दोन समस्या सुटण्याची शक्यता बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)