शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएस डॉक्टरसह पित्याची प्रतीकात्मक धिंड: आदर्श विवाहाला पाच महिन्यातच गालबोट

By सुरेंद्र राऊत | Updated: November 3, 2022 19:32 IST

मुलीकडच्यांनी आपल्या मुलीची बदनामी केली म्हणत डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतीकात्मक धिंड काढली.

लाडखेड (यवतमाळ) : येथील एका एमबीबीएस युवकाचा ७ मे २०२२ रोजी अकोट येथील एका उच्च शिक्षित युवतीशी विवाह झाला होता. मात्र पाच महिन्यातच त्यांच्या आदर्श विवाहाला गालबोट लागले. मुलीकडच्यांनी आपल्या मुलीची बदनामी केली म्हणत चक्क डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतिमेसह गावातून प्रतीकात्मक धिंड काढली. ही घटना येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडली. 

येथील एक युवक एमबीबीएस डॉक्टर आहे. सध्या तो युवक दारव्हा तालुक्यात एका ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. पाच महिन्यांपूर्वी ७ मे रोजी अकोला जिल्ह्यातील अकोट येथील एका युवतीशी त्यांचा विवाह जुळला. साक्षगंधाच्या कार्यक्रमातच आदर्श पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला. या विवाहाची त्यावेळी पंचक्रोशीत आदर्श विवाह म्हणून गणना झाली. मात्र साक्षगंधातच विवाह उरकण्यात आल्याने काही नातेवाईक नाराजही झाले होते. 

पाच महिन्यांच्या संसारादरम्यान डॉक्टर पती व उच्चविद्याविभूषित पत्नीमध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर युवतीने आपल्या आई-वडिलांना लाडखेड येथे बोलावून घेतले. जवळपास १५ दिवसांपूर्वी ती त्यांच्यासोबत माहेरी निघून गेली. यादरम्यान तिच्या माहेरच्यांनी डॉक्टर व त्यांच्या वडिलांना समाजाच्या बैठकीत भेटण्यासाठी बोलावले. मात्र ते आलेच नाहीत. दुसरीकडे सासरचे कुटुंब आपल्या मुलीची बदनामी करीत असल्याचा आरोप युवतीच्या कुटुंबातील सदस्यांनी केला. मुलीची समाजात बदनामी झाली असून आमचीही फसवणूक झाल्याचा संताप मुलीच्या माहेरच्यांनी व्यक्त केला.

या संतापातूनच त्यांनी जाहीर निषेध पत्रक काढले. बुधवारी हे पत्रक दारव्हा आणि लाडखेड येथे वाटण्यात आले. त्यानंतर लाडखेड येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुलीकडच्यांनी डॉक्टर जावई व त्याच्या वडिलांच्या प्रतिमेसह गावातून त्यांची प्रतीकात्मक धिंड काढली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. मात्र या प्रकरणी पोलिसात कुणीही तक्रार दाखल केली नाही. 

एका मुलीच्या बापाची आत्मकथातरुणीच्या वडिलांनी चक्क जय शिवराय असे वर लिहीत ‘एका मुलीच्या बापाची आत्मकथा’ या शीषर्काखाली पत्रक काढले. या पत्रकाचे दारव्हा आणि लाडखेड येथे वाटप केले. पत्रात त्यांनी शिवरायांच्या स्त्री संरक्षण आणि स्त्रियांचा आदर करण्याचा  उल्लेख केला. मात्र याच आपल्या शिवस्वराज्यात काही बोटांवर मोजण्याइतके षडयंत्र काही समाजकंटक स्त्रियांचा सर्रास अवमान करताना दिसत असल्याचे म्हटले. अशाच षडयंत्राला आम्हीसुद्धा बळी पडल्याचे कथन केले. सासऱ्यांनी आपल्या मुलीची बदनामी केल्याचा पत्रकातून आरोपही केला. मुलीची काहीही चूक नसताना तिला व कुटुंबाला मनस्ताप सोसावा लागत आहे. त्यामुळे खरंच मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Yavatmalयवतमाळdocterडॉक्टर