शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

नगराध्यक्षपदाचा तिढा सुटला

By admin | Updated: October 11, 2015 00:40 IST

येथील नगराध्यक्षपदावरून सुरू असलेला तिढा अखेर दीड महिन्यानंतर शनिवारी सुटला. अपक्ष नगरसेविका करूणा रवींद्र कांबळे यांची नगराध्यक्षपदी निवड होऊनही निकाल ...

कांबळे पदावर आरूढ : लभाने यांनी घेतली उच्च न्यायालयातील याचिका मागेवणी : येथील नगराध्यक्षपदावरून सुरू असलेला तिढा अखेर दीड महिन्यानंतर शनिवारी सुटला. अपक्ष नगरसेविका करूणा रवींद्र कांबळे यांची नगराध्यक्षपदी निवड होऊनही निकाल न्यायालयाच्या निर्देशानुसार राखून ठेवण्यात आला होता. अपिलार्थी प्रिया लभाने व प्रमोद निकुरे यांनी उच्च न्यायालयातून आपली याचीका मागे घेतल्याने नगराध्यक्षपदी करूणा कांबळे यांची निवड झाल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली. मागील दीड वर्षांपासून प्रिया लभाने नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. सुरूवातीला त्यांना नगरसेवकांनी बहुमताने साथही दिली. मात्र या नगरसेवकांचा प्रिया लभाने यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करून २० नगरसेवकांनी त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार केले. लभाने यांनी १२ मे, २९ मे व २३ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण व विशेष सभेचे कार्यवृत्त अद्याप लिहिले नाही. त्यामुळे शहरातील विकास कार्यांना सुरूवात करता येत नव्हती. तसेच लभाने यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोपही अविश्वासाच्या वेळी करण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात रजानगर येथील दारू भट्टीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. शेत सर्व्हे नंबर १०६ मध्ये नगरपालिकेच्या मालमत्तेवर गॅस गोडाउनचे बांधकाम सुरू असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच येथील एका बिल्डरला बांधकामाची परवानगी देण्यात आली. या सर्व बाबींत लभाने यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे प्रिया लभाने यांच्याकडून अपेक्षित असलेली विकास कामे केली जात नव्हती. शनिवारी करूणा कांबळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारत पत्रकार परिषद घेऊन वरील सर्व आरोपांसह काही गंभीर आरोपही केले. प्रिया लभाने जनता व नगरसेवकांना असभ्य वर्तणूक देऊन वारंवार अपमानीत करीत होत्या, असे कांबळे यांनी सांगितले. अविश्वास ठराव पारित होऊनही प्रिया लभाने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ंखंडपीठात याचीका दाखल केली. त्यात त्यांनी अविश्वास ठरावासाठी घेण्यात आलेली सभा अवैध ठरविण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयीन बाबींमध्ये एक महिना गेल्यानंतर आता अचानकपणे प्रिया लभाने यांनी याचीका मागे घेतली आहे. ही याचिका मागे का घेण्यात आली, याचे गुढ मात्र अद्यापही कुणालाच कळले नाही. तथापि आजपासून नगरपरिषदेला पूर्णवेळ नगराध्यक्ष मात्र मिळाला. उर्वरित एक वर्षाच्या काळात आपण सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन अधिकाधिक विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे करूणा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)