शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात गादी कारखान्याला आग; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:26 IST

स्थानिक आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटीत शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शॉटसर्किटने गादी कारखान्याला भीषण आग लागली.

ठळक मुद्देतीन गॅस सिलिंडरचा स्फोट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटीत शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शॉटसर्किटने गादी कारखान्याला भीषण आग लागली. यावेळी शेजारील पाणीपुरीवाल्याकडे असलेले तीन गॅस सिलिंडर फुटल्याने आग आणखीनच वाढली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर शेख यांचा हा गादी कारखाना आहे. त्यांच्या विद्युत मीटरनजीक असलेल्या बोर्डात स्पार्किंग झाले. त्यातूनच ही आग लागली. आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून गुर्जर यांचे कच्चे घर आहे. तेथे पाणीपुरी विकणारे भाड्याने राहतात. या घरालाही आग लागली. यावेळी घरात असलेल्या महिला व मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच यवतमाळ नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाचे दोन बंब दाखल झाले. परंतु त्यापैकी एकात पाणीच नसल्याने या बंबला ऐनवेळी पाणी भरण्यासाठी जावे लागले. गादी कारखान्याच्या बाजूने असलेल्या अक्वा व अन्य दुकानांनाही आगीचा फटका बसला.

 

टॅग्स :fireआग