शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित मुलगीही अनुकंपा नोकरीस पात्र; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 10:57 IST

मृताची मुलगी विवाहित असली तरी तिचा दावा संपत नाही, वारसदार म्हणून अनुकंपा नोकरीस ती पात्र ठरते, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे व सोलापूरच्या दोन महिलांना मोठा दिलासा दिला.

ठळक मुद्देविवाह होणारच, नाव बदलणारच

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मृताची मुलगी विवाहित असली तरी तिचा दावा संपत नाही, वारसदार म्हणून अनुकंपा नोकरीस ती पात्र ठरते, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे व सोलापूरच्या दोन महिलांना मोठा दिलासा दिला.प्रतिभा त्र्यंबक पवार यांनी ठाणे जिल्हा परिषदेविरुद्ध तर सोनिका विठोबा काशीद यांनी सोलापूर जिल्हा परिषदेविरुद्ध अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. विवाहित आहे, या कारणावरून दोघींनाही अनुकंपा नोकरी नाकारण्यात आली होती. दोघींचीही प्रकरणे कमी अधिक प्रमाणात सारखीच आहेत. दोन्ही प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. आर.एम. सावंत आणि के.के. सोनवणे यांच्या खंडपीठाने ४ सप्टेंबर रोजी एकाच वेळी निर्णय दिला. मृताच्या वारसदार मुलींचे लग्न झाले, त्यांचे नाव बदलले म्हणून त्या अनुकंपा नोकरीसाठी अपात्र होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी नवीन शासन आदेश काढला असून जुने आदेश रद्द ठरविल्याची बाबही सरकारी पक्षाच्या निदर्शनास आणून दिली.दोन्ही प्रकरणात १७ नोव्हेंबर २०१६ च्या जीआरचा अवलंब करा, जुने जीआर वापरु नका, नव्या जीआरने काम मार्गी लावा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या. सोनिका व प्रतिभा यांचे प्रकरण ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत निकाली काढण्याचे आदेश संबंधित जिल्हा परिषदेच्या सीईओंना देण्यात आले.विवाह होणारच, नाव बदलणारचप्रतिभा पवार या एकमेव अपत्य नाही, त्यांना चार बहिणी आहेत, आई-वडील मरण पावले आहेत. त्यांच्यावर कुटुंब अवलंबून नाही, त्या विवाहित आहेत, असे नमूद करीत त्यांना अनुकंपा नोकरी नाकारण्यात आली होती. त्यावर कुणाही मुलीचा विवाह होणारच आणि नाव बदलणारच म्हणून तुम्ही नोकरी देणार नाही काय?असा जाब न्यायालयाने विचारला.

ही तर प्रशासनाची पश्च्यात बुद्धीसोनिका काशीद या विवाहित असल्याने त्यांना अनुकंपा नोकरी मिळणार नाही, असे सांगितले गेले. त्यामुळे त्यांच्या अशिक्षित आईने मग मुलाला नोकरी द्या, असे म्हणून अर्जावर अंगठा लावला. हाच मुद्दा सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने उच्च न्यायालयात रेटला. मात्र तुमच्यामुळे गुंता निर्माण झाल्याचा ठपका न्यायालयाने प्रशासनावर ठेवला. गुंता निर्माण करून नोकरी नाकारणे ही प्रशासनाची पश्च्यात बुद्धी आहे, असे नमूद करीत ‘काही तरी दया दाखवा’ अशा सूचना प्रशासनाला केल्या.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय