शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बंद, हमी केंद्रांचाही पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:45 IST

खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक बाजारात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. तर दुुसरीकडे शासकीय हमीकेंद्राचा अद्यापही मुहूर्त निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तरी कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन विकायचे कसे? : खेडा खरेदीतून शेतकऱ्यांची लूट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक बाजारात येण्यास सुरूवात होताच बाजार समित्यांनी बंद पुकारला आहे. तर दुुसरीकडे शासकीय हमीकेंद्राचा अद्यापही मुहूर्त निघाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकायचा तरी कुठे, असा गंभीर पेच निर्माण झाला आहे. या स्थितीचा फायदा घेत खासगी व्यापाºयांनी शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात सहकार विभागाच्या यंत्रणेला पूर्णत: अपयश आले आहे.केंद्र शासनाच्या वित्त विभागाने तेलबीयांवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचे आदेश दिले आहेत. जीएसटी आकारताना व्यापारी आणि अडत्यांवर बंधने आली आहेत. या जीएसटीला अडते आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. या विरोधात बाजार समित्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार ठप्प झाला आहे.सतत तीन वर्षापासूनच्या निसर्ग प्रकोपाने जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी प्रारंभापासूनच आर्थिक अडचणीत आहे. अशा स्थितीत खरिपात सोयाबीनच्या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रब्बी खेरीज पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला पहिली पसंती दिली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. याचवेळी बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे.याला पर्याय शासकीय हमी केंद्र आहेत. मात्र या ठिकाणी नोंदणी प्रक्रियाच सुरू आहे. या ठिकाणी अद्यापही खरेदीची प्रक्रियाच सुरू झाली नाही. अशा स्थितीत खासगी व्यापाऱ्यांशिवाय शेतकºयांकडे पर्याय नाही. या व्यापाऱ्यांकडे धान्य खरेदीचा परवाना नाही. यानंतरही हे व्यापारी गावामध्ये जाऊन वाट्टेल त्या दरात सोयाबीनची खरेदी करीत आहेत. सोयाबीनचे हमीदर ३३९९ रूपये आहेत. बाजार समित्यांमध्ये व्यापारी २९०० रूपये क्विंटलपर्यंत सोयाबीन खरेदी करीत होते. परवाना नसलेले व्यापारी दोन ते अडीच हजार रूपयाच सोयाबीन गिळण्याचा प्रयत्न करीत करीत आहे. यातून शेतकऱ्यांची अक्षरश: लूट सुरू आहे.यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सहकार विभागाची आहे. मात्र सहकार विभागाने अद्यापही यासंदर्भात कारवाई केली नाही. यामुळे शेतकरी नाडला जात आहे. खेडा खरेदी करणारे व्यापारी आणि परवाना नसलेले व्यापारी बिनधास्तपणे शेतकºयांची लूट करीत आहेत.