शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मंडई बंदने शेतकऱ्यांनी फेकली रस्त्यावर भाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 05:00 IST

कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे.

ठळक मुद्देलिंक तोडली : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच रविवारचा भाजी हर्रास थांबला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत आठवड्याला भाजी विक्रेत्यांची ३०० टन भाजी विक्रीविनाच राहिली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. यामुळे भाजीमंडी विक्रेता संघटनेने रविवारी शेतमालाचा हर्रास न करण्याचा निर्णय घेतला. यातून १२ हजार ग्राहकांची साखळी तुटली. शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी रस्त्यावर बसावे लागले.कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: १० ते १२ हजार नागरिक भाजीमंडीत येतात. ही गर्दी कोरोनासाठी पोषक आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने २९ मार्चला भाजीमंडीत नाकाबंदी केली. परिणामी ३०० टन भाजी विक्रीविना सडली.अशा स्वरूपाचे नुकसान पुन्हा होऊ नये म्हणून भाजीमंडी विक्रेत्यांनी रविवारी भाजीविक्रीच न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे ५ एप्रिलला या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अनेक शेतकºयांना याची कल्पणा नव्हती. त्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी मंडीत आणला. विक्री न झाल्याने रस्त्याच्या कडेला तो विकला. या ठिकाणी नागरिकांनी पुन्हा गर्दी केली. यामुळे पोलिसांच्या रोषालाही सामोरे जावे लागले.भाजी विक्री सुरळीत पार पाडावी याकरिता प्रत्येक प्रभागात विक्रेत्यांचे नियोजन करण्यात आले आहे. असे असले तरी नियोजित प्रभागात जाण्यासाठी विक्रेते तयार नाही. ज्या भागात सर्वाधिक भाजी विकली जाते, अशा ठिकाणी घोळका केला जातो. यामुळे पोलीस प्रशासनानेही अशा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या कारवाईविरोधात विक्रेतेही प्रचंड रोष व्यक्त करीत आहेत.अपुरे व्यापारी आणि जादा भाजीपाला४८० व्यापाऱ्यांनी भाजी विक्रेते म्हणून नोंद केली. त्यातील अनेक विक्रेते डमी आहे. गत आठ दिवसात यातील मोजकेच विक्रेते भाजी खरेदीसाठी आले आहे. यामुळे इतर विक्रेते गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मर्यादित भाजी आणायची तर इतर प्लॉटमधील भाजीचे करायचे काय, असा पेच भाजीपाला उत्पादकांना सतावत आहे.ठोक आणि चिल्लर दरातील तफावत वाढलीभाजीपाला खरेदी करणारे व्यापारी मोजकेच आहेत. भाजीची मागणी जास्त आहेत. यामुळे मोजकेच विक्रेते तुटवडा भासवत जादा दरात भाजीची विक्री करीत आहे. मुळात शेतकºयांकडून कमी दरातच भाजीची खरेदी झाली आहे.मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांना भाजीची परवानगी दिली तर हा गोंधळ संपेल. भाजी विक्रीची परवानगी देताना भाजीमंडी संघटनेतील पदाधिकाऱ्यांना विचारणा केली तर हा विक्रेता आहे की नाही, असा प्रश्नही राहणार नाही.- गजानन बरे,अध्यक्ष, भाजी विक्रेता संघटना

टॅग्स :Marketबाजारvegetableभाज्या