शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव तालुक्याला गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:05 IST

ऑनलाईन लोकमतमारेगाव : तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या गारपिटीने कुंभा आणि मार्डी महसूल मंडळातील १४ ते १५ गावांना प्रचंड तडाखा बसला.सोमवारी झालेल्या गारपिटीचा थर मंगळवारी दुपारपर्यंत कायमच होता. यात शेकडो हेक्टर रबीची पिके उद्ध्वस्त झाली. यात प्रामुख्याने मार्डी मंडळातील सर्वाधिक नुकसान शिवणी (धोबे) या गावातील झाले आहे. ...

ठळक मुद्देदोन जनावरांचा मृत्यू : शेकडो हेक्टरवरील रबी पिके उद्ध्वस्त

ऑनलाईन लोकमतमारेगाव : तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या गारपिटीने कुंभा आणि मार्डी महसूल मंडळातील १४ ते १५ गावांना प्रचंड तडाखा बसला.सोमवारी झालेल्या गारपिटीचा थर मंगळवारी दुपारपर्यंत कायमच होता. यात शेकडो हेक्टर रबीची पिके उद्ध्वस्त झाली. यात प्रामुख्याने मार्डी मंडळातील सर्वाधिक नुकसान शिवणी (धोबे) या गावातील झाले आहे. या गावातील सर्वच शेतकऱ्यांची रबीची पिके नष्ट झाली. गहू, चना, ज्वारी उर्वरित कापूससुद्धा भूईसपाट झाला. झाडांना पाने राहिली नाही. पक्षी मरून पडले. भाऊराव बदखल यांची गाय गारपीटीच्या माराने गतप्राण झाली. त्याखालोखाल लगचती पार्डी, चनोडा, गाडेगाव, केगाव, चोपण, मजरा, गावालासुद्धा तडाखा बसला. चनोडा येथील भाऊराव चायकाटे यांचा दोन वर्षाचा गोऱ्हा मरण पावला.कुंभा महसूल मंडळात गारपीटींचा सर्वाधिक तडाखा टाकळी गावाला बसला. शेतकऱ्यांचा चना, गहू, कापूस नेस्तनाभूत झाला. घरावरील कवेलू फुटले, नाल्याशेजारी असणाऱ्या वडाचे पुरातन झाडाला गारपीटीने पानसुद्धा ठेवले नाही. त्याखालोखाल कुंभा, महादापेठ, मांगली, कोथुर्ला, रामेश्वर, खैरगाव बुटी, चिंचमंडळ, दापोरा गावालाही झोडपून काढले. अचानक झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तहसीलदार विजय साळवे, नायब तहसीलदार गोहोकार यांनी गारपीटग्रस्त सर्व गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून मंडळ अधिकारी, तलाठ्यांना गारपीटग्रस्त नुकसानीचे तत्काळ पंचनामा करण्याचे सूचित केले.दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांनी गारपीटग्रस्त गावांना भेटी देऊन गारपीट नुकसानीचे पंचनामे करण्याच्या तहसीलदारांना सूचना केल्या. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली.नुकसान भरपाई न दिल्यास शिवसेना करणार आंदोलनमाजी आमदार विश्वास नांदेकर यांनी मंगळवारी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतांची पाहणी केली. बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ हेक्टरी २० हजार रूपयांची मदत जाहीर करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विश्वास नांदेकर यांनी दिला. याप्रसंगी त्यांच्यासोबत मारेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय आवारी उपस्थित होते.