शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव नगरपंचायतच्या सीओंना हटवा!

By admin | Updated: April 24, 2017 00:11 IST

येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षाली राणे यांच्याविषयी सर्वपक्षीय सदस्यांत कमालिचा असंतोष आहे.

नगरसेवक एकवटले : समन्वय सभेत आमदारांना साकडे, बदलीची मागणीमारेगाव : येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षाली राणे यांच्याविषयी सर्वपक्षीय सदस्यांत कमालिचा असंतोष आहे. शनिवारी पार पडलेल्या समन्वय समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी राणे यांना धारेवर धरीत प्रश्नांचा भडीमार केला. तसेच त्यांच्या बदलीची मागणी लावून धरली. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी मुख्याधिकाऱ्यांना समज देत कामात सुधारण करण्याच्या सूचना दिल्या. येथील मुख्याधिकारी हर्षाली राणे त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्या अल्पावधीतच वादग्रस्त ठरल्या आहेत. दोन महिन्यापूर्वी विरोधी सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध उपोषण केले होते. त्यासोबत नगरपंचायतीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तेरवीचा कार्यक्रमही केला होता. त्यामुळे नगरपंचायत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. जिल्हा प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत मुख्याधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु हर्षाली राणे यांनी कामात सुधारणा न करता विकास कामे ठप्प केली आहे, असा सदस्यांचा आरोप आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपये नगरपंचायतीकडे जमा आहे. परंतु राणे यांच्या अडेलतट्टू भूमिकेने शहरात समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. त्यातच विकास कामांसाठी आलेला निधी परत जाण्याची भीती आहे. त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनी राणे यांच्यावर रोष असून राणे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. शनिवारी समन्वय समितीच्या सभेमध्ये आमदारांसमोर नगरपंचायतीचा विषय निघताच विरोधकासोबतच सत्ताधारी सदस्यांनीही राणे यांच्या कामाचा पाढा वाचला. हर्षाली राणे यांना मात्र सदस्यांच्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. मी नवीन आहे, असे उत्तर त्या देत होत्या. आ. बोदकुरवार व एसडीओ मिश्रा यांनी त्यांना समज दिली. यासंदर्भात हर्षाली राणे यांच्याशी संपर्क केला असता, मी सध्या रजेवर आहे. या विषयावर मला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)सीओ हर्षाली राणे एक महिन्याच्या रजेवरनगरपंचायतीचे सर्व सदस्य विरोधात गेल्याने आणि नगरपंचायतीमध्ये काम करणेही अवघड झाल्याने हर्षाली राणे ऐन उन्हाळ्यात एक महिन्याच्या रजेवर गेल्या आहेत. त्यांना मारेगाव येथे काम करायचे नसून त्या बदली करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. शहरात पाणी टंचाई, नाली सफाई, पथदिवे आदी कामे एक महिन्यांपासून ठप्प आहे. आता मुख्याधिकारी रजेवर गेल्याने या समस्या उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.