शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मार्चमध्येच मे हिटचा तडाखा

By admin | Updated: March 27, 2017 01:14 IST

यंदा मार्च महिन्यातच जिल्हावासीयांना मे हिटचा तडाखा बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.

पारा ४१ अंशावर : जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट, अंगाची लाहीलाहीयवतमाळ : यंदा मार्च महिन्यातच जिल्हावासीयांना मे हिटचा तडाखा बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.दरवर्षी साधारणत: एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा प्रकोप जाणवतो. मे महिन्यात तर पारा दररोज ४१ अंशावर पोहचतो. मात्र यावर्षी उन्हाची तिव्रता मार्चमध्येच जाणवत आहे. यामुळे मे हिटचा तडाखा मार्चमध्येच बसल्याने जिल्ह्यातील जनजीवन प्रभावीत झाले आहे. उन्हाच्या तिव्रतेने दुपारी रस्ते सामसूम झाले आहे. गेल्या १६ वर्षात यंदा प्रथमच मार्च महिन्यातच उन्हाचा पारा ४० अंशावर पोहचला. यामुळे सारेच नागरिक अचंबित झाले आहे. मार्च महिन्यातच उन्हाची तिव्रता एवढी प्रखर असेल, असे कुणाच्याच ध्यानीमनी नव्हते. येत्या एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा प्रकोप आणखी किती वाढेल, हे सांगणे सध्या अवघड झाले आहे.गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा प्रकोप वाढल्याने शीतपेय आणि शितफळांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुपारच्या सुमारास बाजारातील चहलपहल थांबली आहे. आज रविवार, हा बाजाराचा दिवस होता. मात्र उन्हाच्या झळांमुळे बाजारातील गर्दी मंदावल्याचे दृष्य अनुभवायला मिळाले. (शहर वार्ताहर)नैसर्गिक आपत्ती विभागाने यंदाचे वर्ष उष्णतेचे राहणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार या विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उन्हाळ्यात घ्यावयाच्या काळजी बाबत जनतेला अवगत करण्याचे निर्देशही दिले होते. या विभागाचा अंदाज तूर्तास खरा ठरत आहे. १६ वर्षांनंतर यंदाचा उन्हाळा तीव्रगेली १६ वर्षे एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा तडाखा बसत होता. मात्र यंदा मार्चमध्येच पारा भडकला आहे. उन्हामुळे नागरिक कासावीस झाले आहे. अनेकांनी कधीचेच कुलर बाहेर काढले आहे. दुपारी उन्हात बाहेर निघणे टाळले जात आहे. उन्हाचा हा प्रकोप आणखी सप्ताहभर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.