रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यावर्षी पश्चिम विदर्भाला बसला आहे. या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या वाटेवर आहेत. यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी गंभीर स्थिती आहे.ग्लोबल वार्मिंगच्या प्रकोप वाढतच आहे. यावर्षी अलनिनोचा प्रभाव नसला तरी कमी दाबाचा पट्टा तयार न झाल्याने पश्चिम विदर्भात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झाला आहे. भविष्यातील रब्बी हंगाम अडचणीत सापडण्याचा धोका आहे.हमखास पाऊस बरसणाºया यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ, कळंब आणि राळेगावात केवळ २६ ते २७ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्यातील जलाशयात सरासरी २० टक्के जलसाठा आहे. सहा लघु प्रकल्प कोरडे पडले आहे.अमरावती विभागातील उर्ध्व वर्धामध्ये ४८, अरूणावती २२, बेंबळा २९, पूस ४८ तर नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह ११, कामठी खैरी ५३, इटियाडोह २९, सिरपूर ४, गोसीखुर्द २० आणि निम्न वर्धा प्रकल्पात २७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा झाला आहे. पूर्णा येलदरी ४, माजलगाव ६, मांजरा ३०, निम्न दुधाना ४१ टक्के भरला आहे.पश्चिम महाराष्ट्र पावसाच्या बाबतीत श्रीमंतपश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील मुख्य जलप्रकल्पात मुबलक पाण्याचा संचय झाला आहे. काही प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होण्याची स्थिती आहे. पुणे विभागातील डिंभे, पानशेत, खडकवासला, पवनार, चासकमान, भामा आसखेड, निरा देवघर आणि वारणा प्रकल्पात ९९ ते १०० टक्के जलसाठा झाला आहे. उजनी प्रकल्प ७५ टक्के भरला आहे. तर नाशिक विभागातील भंडारदरा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. दरणा ९८, गंगापूर ९४, मुकणे ७३, करंजवन ९८, गिरणा ५५, उर्ध्व वैतरणा ९६, मुळा ७५, निळवंडे ९५, हातनूर ५७ तर वाघूर प्रकल्पात ६४ टक्के जलसाठा आहे.ग्लोबल वार्मिंगचा हा प्रकार आहे. तापमानातील चढ-उताराने उत्तर भारतातच कमी दाबाचे क्षेत्र तयार होत राहीले. यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कोसळला नाही. याचा परिणाम उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.- सुरेश चोपने, हवामान अभ्यासक
मराठवाडा, विदर्भाच्या जलाशयाने तळ गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 15:25 IST
निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका यावर्षी पश्चिम विदर्भाला बसला आहे. या ठिकाणच्या जलाशयांनी तळ गाठला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलाशय ‘ओव्हरफ्लो’च्या वाटेवर आहेत. यामुळे यावर्षी पश्चिम विदर्भाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशी गंभीर स्थिती आहे.
मराठवाडा, विदर्भाच्या जलाशयाने तळ गाठले
ठळक मुद्देसहा लघु प्रकल्प कोरडे