शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी दरोड्याचे मराठवाडा कनेक्शन; दहा आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 14:58 IST

यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी दरोड्यातील दहा आरोपींना अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

ठळक मुद्देनांदेडच्या हिमायतनगरमध्ये धाडसत्रदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उमरखेड तालुक्याच्या ढाणकी ते खरुस रोडवर २९ ऑगस्ट रोजी पडलेल्या सशस्त्र दरोड्याचे मराठवाडा कनेक्शन पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दरोड्यातील दहा आरोपींना अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विश्वनाथ शंकर शिंदे (२२), रा. उमरी जि. नांदेड, शुभम मुकुंद अडकीने रा. पवार कॉलनी भोकर, मनोज उर्फ चंद्रकांत लक्ष्मकांत मनोरवार (३१) रा. कोळगल्ली भोकर, विकास किसन परिमल (३९) रा. ढाणकी, रामचंद्र लक्ष्मण संजेवाड (१८) रा. नंदीनगर शिवाजी चौक भोकर, सुरज गौतम सावते (२१) रा. पवना ता. हिमायतनगर, चंद्रकांत गौतम सावते (२८) रा. पवना, धम्मदीप नारायण राऊत (२१) रा. पवना, अजय शेकू राऊत (२०) रा. पवना आणि नितीन उर्फ एक्का नारायण अडुलवार (२०) रा. रापर्तीवारनगर उमरी ता. हिमायतनगर जि. नांदेड यांचा दरोड्यातील आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांना अटकही करण्यात आली.

त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा टीयूव्ही कार, यामा मोटरसायकल, स्प्लेन्डर, होंडा लिओ मोटरसायकल, चार चाकू, एक तलवार, एक कुशा, सहा मोबाईल व दरोड्यातील सोने असा दहा लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उमरखेडचे प्रभारी एसडीपीओ बागवान यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक संदीप चव्हाण, फौजदार निलेश शेळके, श्रीकांत जिंद्दमवार आदींनी अवघ्या चार दिवसात हा गुन्हा उघडकीस आणला.

२९ ऑगस्ट २०२० च्या सायंकाळी जिल्हावार यांच्या शेतातील गोठ्यावर दहा ते १५ जणांनी सशस्त्र दरोडा घातला. शेतातील दोन सालगडी, त्यांची पत्नी व मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. एका सालगड्याला चाकुने मारहाण केली. तर दुसऱ्याला विहिरीत लोटून देऊन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला गेला. सालगड्याच्या पत्नीच्या गळ्यातील २० हजारांचे सोने दरोडेखोरांनी लुटून नेले. या प्रकरणी बिटरगाव पोलिसांनी भादंवि ३९५, ३९७, ३०७, ३२३, ५०६, कलमान्वये गुन्हा नोंदविला. दरोड्याच्या या घटनेमुळे ढाणकी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. एलसीबीने अवघ्या चार दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला. एलसीबीच्या या पथकात गोपाल वास्टर, गजानन डोंगरे, मुन्ना आडे, पंकज पातुकर, उल्हास कुरकुटे, मो.ताज, किशोर झेंडेकर, दत्ता दुंम्हारे, गणेश वास्टर, बिटरगावचे एपीआय विजय चव्हाण, फौजदार जायेभाये, पोलीस शिपाई खामकर, गिते, चव्हाण यांचा समावेश होता.

ढाणकीत तीन पेट्या सोने दडवून असल्याची होती टीपढाणकी येथील विकास किसन परिमल याने दोन महिन्यांपूर्वी चंद्रकांत गौतम सावते रा. पवना याला ढाणकी ते खरुस रोडवर संजय जिल्हावार यांच्या शेतातील गोठ्यात तीन पेट्या सोने ठेवले असल्याची टीप दिली होती. त्यावरून चंद्रकांतने दोन महिन्यांपासून जिल्हावार यांच्या गोठ्यावर पाळत ठेवली होती. अखेर या शेतात दरोडा टाकण्याची योजना आखली गेली. त्यासाठी पवना, भोकर, उमरी येथून साथीदारांची जुळवाजुळव चंद्रकांतने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी