शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:27 IST

मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मराठी भाषा गौरव दिन, जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे. मराठी लोकाभिमुख तसेच ज्ञानभाषा होणे गरजेचे असून, तिच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन तसेच संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. भराडी, माहिती व सूचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते, संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर, प्रदर्शनाच्या संयोजिका राजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे आपल्या मुलांनाही मराठी भाषेतून शिकविण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही पाल्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून झाले, याचा मला आनंद आहे. आजच्या तरुण पिढीने दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले, भाषा प्रभावीपणे बदलत असते. तसेच चालिरीती आणि परंपरासुध्दा बदलतात. भाषा आणि परंपरा यांचे एक वेगळे नाते आहे. भाषेच्या समृध्दीसाठी अनेकांनी योगदान दिले असून मराठीला आणखी प्रगत करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.मराठीचा गौरव केवळ एका दिवसाकरिता नव्हे तर, नेहमी झाला पाहिजे, असे संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर यांनी सांगितले. यावेळी अंजली सरूरकर, वेदश्री घोरकर यांनी गीत सादर केले.प्रास्ताविक निवासी उप जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन प्रा. ताराचंद कंठाळे यांनी तर आभार जीवन कडू यांनी मानले.ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनजिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह विनोद देशपांडे, सदस्य मनोज रणखांब उपस्थित होते.फीत कापून ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालयातील विजय मुळै, रवींद्र वानखेडे, लालसा गुल्हाने यांच्यासह ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.