शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील ४ लाख ९६ हजार कुटुंब

By सुरेंद्र राऊत | Updated: February 1, 2024 17:40 IST

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचा शुक्रवार २ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ९६ हजार ४९३ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात २३ जानेवारीपासून सुरु झालेल्या सर्वेक्षणासाठी ३ हजार २९५ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. १ हजार ९३९ गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरु झाले आहे. प्रगणक घरोघरो भेटी देवून सर्वेक्षणातील माहिती घेत आहेत. यापैकी ३१ जानेवारीपर्यंत १ हजार २३८ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. प्रति प्रगणक सर्वेक्षण झालेल्या कुटुंबाची संख्या १५१ आहे. उर्वरित गावांचे सर्वेक्षण मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

जिल्ह्यात मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे. पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने समिती गठित करण्यात आली आहे. याच अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी सर्वेक्षण कामात सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण