शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
3
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
4
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
5
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
6
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
7
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
8
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
9
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
10
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
11
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
12
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
13
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
14
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
15
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ
16
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
17
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
18
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
19
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
20
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO

वणी तालुक्यात अनेक गावांना विषाणूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:55 IST

विषाणूंसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने वणी तालुक्यातील अनेक गावे तापाने फणफणत आहेत. वणी शहरासह तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ पसरली आहे.

ठळक मुद्देतापाचे शेकडो रूग्ण : खासगीसह शासकीय रूग्णालयेही तुडूंब, ग्रामीण रूग्णालयात दररोज २५० रूग्णांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : विषाणूंसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने वणी तालुक्यातील अनेक गावे तापाने फणफणत आहेत. वणी शहरासह तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी वणी शहरातील खासगी दवाखान्यांसह ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांची दररोज उपचारासाठी गर्दी होत आहे.पावसाचा जोर ओसरल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तापमानात कमालिची वाढ झाली आहे. मध्यरात्रीनंतर मात्र हलकी थंडी पडू लागली आहे. दिवसा तिव्र उन्हं आणि रात्री थंडी, अशा विचित्र वातावरणाने विषाणूजन्य आजाराने डोके वर काढले आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावे तापाने फणफणत आहेत. राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया नवेगाव, विरकुंड या गावामध्ये तापाचे रुग्ण वाढत असल्याची बाब लक्षात येताच, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्या सूचनेवरून डॉक्टरांच्या एका पथकाने गावात जाऊन रुग्णांवर उपचार केले, तसेच अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काहींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वणी शहरातही विषाणूजन्य आजाराची साथ पसरली आहे. घराघरांत तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही तापाच्या रुग्णांची तुडूंब गर्दी दिसून येते.वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० पेक्षा अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. या रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांच्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाºयांवरील कामाचा ताण चांगलाच वाढला आहे.स्वाईन फ्ल्यूचे आठ संशयित रूग्ण आढळलेगेल्या महिनाभरात वणी परिसरात स्वाईन फ्ल्यू या आजाराची लक्षणे असलेले जवळपास आठ रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. यांपैैकी काही रुग्णांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली, तर ज्यांची प्रकृती गंभीर होती, त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी वणी शहरातील एका महिलेच्या आजारात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळून आल्याने तिला तातडीने नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. भालर येथील एका महिलेलादेखील स्वाईन फ्ल्यू झाल्याच्या शंकेवरून नागपूर येथे रवाना करण्यात आले.तालुक्यातील अनेक गावांत विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागातर्फे उपचाराच्या उपाययोजना करण्यात येत आहे. औषध साठाही मुबलक आहे.डॉ.विकास कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी