शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:48 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे.

ठळक मुद्देसीईओंकडून अपेक्षा : संघटनेचा पाठपुरावा अद्याप सुरूच

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या समस्या सोडविण्यासाठी आता आरोग्य कर्मचारी एल्गार पुकारण्याच्या मन:स्थितीत आहे.नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी वाढीव दराने भत्ता लागू करणे व थकबाकी प्रदान करण्याचा निर्णय प्रलंबित आहे. इतर कर्मचाऱ्यांना एकस्तर लागू झाला असताना आरोग्य विभाग मात्र कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व वाढीव भत्ता देण्यास चालढकल करीत आहे. आरोग्य विभागात पदोन्नतीची अनेक प्रकरणे खितपत पडली आहे. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहे. कालबद्ध आणि आश्वासित पदोन्नतीचा लाभही देण्यात आला नाही.काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी त्यांना या पदोन्नतीचा लाभ मिळाला नाही. एक वर्षावरील कालबाह्य देयके तशीच पडून आहे. भविष्य निर्वाह निधीतून पैसे देण्यासही चालढकल केली जाते. ज्येष्ठतेनुसार प्रकरणे मंजूर किंवा नामंजूर केली जात नाही.विविध रजाप्रकरणेही पडून आहे. ही प्रकरणे निकाली काढताना ज्येष्ठता हा निकष लावला जात नाही. आंतरजिल्हा बदलीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. ही प्रकरणे ज्येष्ठतेनुसार निकाली काढावी, अशी आरोग्य कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. आरोग्य विभागात काही पदे नव्याने निर्माण झाली. ही पदे पदभरतीच्या नियमानुसार भरण्याची सूचना शासनाने केली.मात्र कोणतीही रिक्त पदे सरळ सेवेद्वारे भरण्याचा सपाटाच आरोग्य विभागाने लावला आहे. बदली प्रकरणात अनेक कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे नवनिर्मित पदे बदलीकरिता खुली असावी, अशी कर्मचाºयांची मागणी आहे.डीएचओ आॅफीसमध्ये नोंदवहीच नाहीडीएचओंकडे स्वाक्षरीसाठी जाणाऱ्या व परत येणाºया फाईलींची कोणतीही नोंदवही नाही. त्यामुळे कर्मचाºयांना अडचण येत आहे. कोणती नस्ती कोणत्या तारखेला डीएचओंकडे गेली व परत आली याबाबत नोंदवही असणे आवश्यक झाले आहे. याशिवाय पीएससीच्या वाहन दुरुस्ती अनुदान, नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील विनंती बदली, मंजूर बिंदूनामावलीतील फेरबदल, जिल्हा प्रशिक्षण पथकात आरोग्य सहायक स्त्री यांची प्रतिनियुक्ती आदी समस्या प्रलंबित आहे. या समस्या सोडविण्याची अपेक्षा महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने व्यक्त केली आहे. संघटनेने यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांना एक पत्र देवून २२ समस्यांचा ऊहापोह करीत आढावा घेण्याची मागणी केली.