शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

नवीन पदाधिकाऱ्यांपुढे अनेक आव्हाने

By admin | Updated: April 10, 2017 01:57 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांसमोर एकीकडे विविध विकासकामांना गती देण्याचे आव्हान आहे.

विविध प्रश्न तीव्र : राळेगाव परिसरात आरोग्य, शिक्षण, पाणीटंचाईची समस्या के.एस. वर्मा   राळेगावराळेगाव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी व सदस्यांसमोर एकीकडे विविध विकासकामांना गती देण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे वर्षानुवर्षे आरोग्य, शिक्षण, पाणीटंचाईसह विविध महत्वपूर्ण सेवांची पदांच्या कमतरतेमुळे विस्कळीत झालेली घडी सुयोग्यपणे बसविण्याकरिताही प्रयत्नांची कसोटी लागणार आहे. राळेगाव तालुक्यात जून २०१६ पासून पूर्ण वेळ तालुका आरोग्य अधिकारी नाही. मारेगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भेरे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. हीच स्थिती कळंब येथील तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या बाबतीतही आहे. मागील चार वर्षांपासून राळेगाव येथे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी नाही. प्रभारावर कामकाज चालविले जात आहे. काही महिन्यांपूर्वी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. आता मागील महिन्यांपासून पुन्हा विस्तार अधिकाऱ्याकडे हा प्रभार देण्यात आला. राळेगाव सोबतच कळंब व बाभूळगाव तालुक्यातही या पदांबाबत असा खेळखंडोबा गेल्या काही वर्षांपासून सतत चालू राहिला आहे. महिला व बाल विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी पद एक वर्षांपेक्षा अधिक काळापासून रिक्त आहे. संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात दोन तालुक्यांचा अपवाद वगळता इतर १४ तालुक्यात प्रभरावर कामकाज सुरू आहे. राळेगाव पंचायत समितीमध्ये तीन शाखा अभियंत्यांची गरज असताना मागील एक-दोन वर्षांपासून केवळ एकाच शाखा अभियंत्याच्या भरवशावर निभावून घेतले जात आहे. वरद सर्कलचा प्रभार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कळंब येथील शाखा अभियंता गणेश शिंगणे यांच्याकडे अतिरिक्त देण्यात आला आहे. ते कळंबवरून परस्परपनेच हा प्रभार पार पडत आहेत. आरोग्य , शिक्षण, महिला व बाल विकास, बांधकाम अभियंते आदी प्रत्येक पद महत्वाचे आहे. प्रत्येक पदाच्या अधिकाऱ्यांना त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे निर्धारित अवधीत पार पाडाव्याच लागतात. या स्थितीत मानहताकडे प्रभार, अतिरिक्त प्रभार आदी बाबींमुळे दोन्ही पदावर अन्याय होतो, त्रुटी राहतात, गैरप्रकारही होऊन जातात. अनेकदा केवळ खानापूर्ती तेव्हढी होते. हे असेच आणखी किती दिवस चालू राहणार याचा विचार करून निर्वाचित पदाधिकारी, संबंधित वरिष्ठ अधिकारी, आमदार, मंत्री आदींनी आवश्यक त्या पदावर पूर्ण वेळ अधिकारी देण्याची नितांत गरज आहे.