शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

संवेदनशील ठाण्यात मनुष्यबळ तोकडे

By admin | Updated: June 20, 2014 00:08 IST

वाढत्या गुन्हेगारी घटनांनी यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हे दोन्ही ठाणे संवेदनशील झाले आहेत. वाढते गुन्हे नियंत्रित करण्यासाठी या ठाण्यांना अतिरीक्त मनुष्यबळ देणे गरजेचे आहे.

कारवाई शून्य : एलसीबीत ६० पोलीस कर्मचाऱ्यांची भरमारयवतमाळ : वाढत्या गुन्हेगारी घटनांनी यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हे दोन्ही ठाणे संवेदनशील झाले आहेत. वाढते गुन्हे नियंत्रित करण्यासाठी या ठाण्यांना अतिरीक्त मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. परंतू या ठाण्यांमध्ये काम करण्यास पोलीस अधिकारीच नव्हे तर कर्मचारीही तयार नाहीत. त्यामुळेच दोन्ही पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक मनुष्यबळाअभावी कुचकामी ठरत आहे. याउलट स्थानिक गुन्हे शाखेत २९ कर्मचाऱ्यांची मंजूरात असताना तेथे ६० च्यावर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहे. असे असतानाही काही अपवाद वगळता या पथकांची उपयोगिता मात्र शून्य दिसत आहे.गेल्या वर्षभरापासून यवतमाळ शहरात घरफोडी आणि जबरी चोरीचे सत्र सुरू आहे. शिवाय शरीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही भरपूर आहे. कामाचा ताण आणि वरिष्ठांचे दडपण अशा कात्रीत येथील अधिकारी व कर्मचारी ठाण्यातील दैनंदीन कामे, बंदोबस्त, तपास करताना दिसतात. दोन्ही ठाण्यातील परिस्थिती पाहून सहसा येथे नियुक्तीसाठी अधिकारीच नव्हेतर कर्मचारीही तयार होत नाही. गुन्हे नियंत्रणाची आणि आव्हानात्मक तपासाचा छडा लावण्याची जबाबदारी असलेले गुन्हे शोध पथकाचीही फारशी उपलब्धता दिसून येत नाही. यवतमाळ शहर ठाण्याच्या गुन्हेशोध पथकात एक जमादार आणि चार कर्मचारी आहे. त्यातील दोन कर्मचारी दिवसा तर तीन कर्मचारी रात्रीला कर्तव्य बजावतात. हिच परिस्थिती वडगाव रोड ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाची आहे. एक अधिकारी आणि पाच कर्मचारी पथकात असून त्यातील तिघे दिवसा तर उर्वरीत दोघे रात्रीला कर्तव्य बजावतात. त्यामुळे गोपनीय माहिती काढून गुन्हेगारांना जेरबंद करणे अथवा गुन्ह्यांचा छडा लावणे शक्य होत नाही. शिवाय दोन्ही ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे ८० च्या घरात मनुष्यबळ आहे. सप्ताहीक रजा, आजारी रजा आणि अन्य कारणावरून दररोज सुमारे १५ कर्मचारी रजेवर असतात. ठाण्याची डायरी, लॉकअप गार्ड, बंदोबस्त यात सुमारे २० कर्मचारी लागतात. त्यामुळे तपास, गुन्ह्यांचा छडा, आरोपी जेरबंद करणे त्यांना शक्य होत नाही. एकीकडे संवेदनशील पोलीस ठाण्यांची ही अवस्था आहे. दुसरीकडे मात्र कधीकाळी ३० च्या घरात मनुष्यबळ कार्यरत रहात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यांच्या अधिनस्थ सहा पथकांमध्ये ६० च्या घरात कर्मचारी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भरणा असल्यानंतरही या पथकांची उपयोगीता मात्र शुन्य आहे. तीन महिन्यांपासून एकाही जबरी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात एकाही पथकाला यश आले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)