शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कम्युनिटी पोलिसिंगचा स्वतंत्र सेल- मनोज केदारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

अनेकदा हातचा तपास सोडून पळावे लागते. ही अडचण सिंगापूर पोलिसांना नाही. सगळ्यात मोठी समस्या संख्याबळाची आहे. याचा समतोल कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून साधल्यास निश्चितच गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन पोलिसांना समाजात सन्मानाची वागणूक मिळणे शक्य आहे.

ठळक मुद्देवाढत्या गुन्हेगारीवर ठरू शकते प्रभावी

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्यूरो ऑफ पोलीस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने भारतातील निवडक पोलीस अधिकाऱ्यांची सिंगापूर येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. यवतमाळ ग्रामीणचे ठाणेदार मनोज केदारे यांनी सिंगापूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर तुलनात्मक पद्धतीने उहापोह केला.भारत आणि सिंगापूरच्या कायद्यात काही फरक आहे का?भारतातीलच कायदे सिंगापूरमध्ये आहेत. आयपीसी, सीआरपीसीच्या तरतुदीनुसारच सिंगापूर पोलीस काम करतात. तेथील शिक्षेची तरतूदही सारखीच आहे. न्यायप्रक्रिया गतिमान असून खटले वेळेत निकाली निघतात.कम्युनिटी पोलिसिंग नेमकी काय संकल्पना आहे ?सिंगापूरमध्ये प्रत्येक तरूणाला किमान दोन वर्षे पोलीस दलात काम करण्याची सक्ती आहे. कम्युनिटी पोलीस पूर्ण अधिकाराने कर्तव्य बजावतात. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये पोलीस व सैन्याविषयी वेगळी आस्था आहे. शिवाय यामुळे गुन्हे घडण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. प्रत्येक जण जबाबदारीने कायदे पाळतो. ५६ लाख लोकसंख्येचा देश असल्याने तेथे हा प्रयोग अतिशय यशस्वी झाला आहे.पोलीस कुठल्या हायटेक तंत्राचा वापर करतात?सिंगापूरमधील इंचन् इंच भूभाग हा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत आहे. त्यामुळे गुन्हा घडला तरी काही मिनिटातच आरोपीची ओळख पटवणे शक्य होते. शिवाय कामाचा ताण नसल्याने प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे काम करते. तेथे कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे पथक स्वतंत्र आहे. वाहतूक पोलीस केवळ वाहतुकीवरच लक्ष ठेवतात. गुन्हे व आरोपींचा शोध घेणारी स्वतंत्र शाखा आहे. त्यांना आपली शाखा सोडून कोणतचे काम दिले जात नाही. उलट महाराष्ट्र पोलिसांची सर्वाधिक एनर्जी बंदोबस्तामध्येच खर्च होते. अनेकदा हातचा तपास सोडून पळावे लागते. ही अडचण सिंगापूर पोलिसांना नाही. सगळ्यात मोठी समस्या संख्याबळाची आहे. याचा समतोल कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून साधल्यास निश्चितच गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन पोलिसांना समाजात सन्मानाची वागणूक मिळणे शक्य आहे.सिंगापूर पोलिसांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलीस अधिक सक्षम आहेत. प्रचंड काम व अपुऱ्या मनुष्यबळावरही येथे काम करण्याची क्षमता आहे. महाराष्ट्र पोलीस सायबर क्राईममध्ये एक्सपर्ट आहेत. गुन्हे घडत नसल्याने सिंगापूर पोलिसांकडे पुरेसा अनुभव दिसत नाही.बंदोबस्ताचा ताण तणाव नाहीसिंगापूरमध्ये मंत्री, आमदारही स्वत:च गाडी चालवितात. व्हीआयपी व सार्वजनिक बंदोबस्ताचा तेथील पोलिसांवर कोणताच ताण नाही. कठोर कायदे अंमलबजावणी व आर्थिक समानतेमुळे प्रत्येक जण कायद्याचे पालन करतो. तेथे पोलिसांना प्रचंड आदर आहे. हे वातावरण उच्च तंत्रज्ञान व कम्युनिटी पोलिसिंगमुळे शक्य झाले आहे. ही संकल्पना आपल्याकडे राबविल्यास युवकांना बेरोजगारीच्या काळात मानधनावर काम करता येईल. शिवाय कायदे पाळण्याचे संस्कार त्यांच्यात रुजल्याने गुन्हे नियंत्रणास मदत होऊ शकते. पोलीस हा आपल्या सुरक्षेसाठी आहे ही भावना वाढीस लागण्यास मदत होते. शिवाय तारुण्यातच जबाबदारीचे भानयेते.

टॅग्स :Policeपोलिस