शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या धास्तीने साखरपुड्यातच मंगलाष्टके; दोन महिने आधीच उरकला लग्न सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 14:02 IST

साखरपुड्यासाठी मोजकी मंडळी जमली. लग्नाची तारीख १४ मे ठरली. पण तेवढ्यात एक समंजस माणूस पुढे आला.

प्रकाश लामणेपुसद(यवतमाळ) : साखरपुड्यासाठी मोजकी मंडळी जमली. लग्नाची तारीख १४ मे ठरली. पण तेवढ्यात एक समंजस माणूस पुढे आला. कोरोना विषाणू पसरू नये म्हणून गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आपणही लग्नाची गर्दी टाळली तर बरे होईल, असा प्रस्ताव ठेवला. वर आणि वधू अशा दोन्हीकडील मंडळींनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला अन् साखरपुड्यातच साधा विवाह सोहळा पार पडला.शासनाच्या आवाहनाला मान देत अन् स्वत:च्या इच्छांना मुरड घालत हा आदर्श विवाह सोहळा रविवारी ८ मार्च २०२० रोजी येथील विरंगुळा केंद्रात पार पडला. १४ मे रोजी ठरलेला लग्नसोहळा दोन महिने आधीच ८ मार्च रोजी झाला. येथील पालडीवाल ले-आउटमधील शेतकरी कैलासराव कदम यांची सुकन्या दिपाली आणि वाशिम जिल्ह्यातील किनखेडा येथील शेतकरी किसनराव अवचार यांचे चिरंजीव शुभम यांचा विवाह नुकताच जुळला होता. लग्नाची तारीखही ठरली होती. तत्पूर्वी रविवारी त्यांचा साखरपुडा येथील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आला होता. दोन्हीकडील निवडक मंडळी या छोटेखानी कार्यक्रमासाठी जमली होती. साखरपुडा झाला अन् पाहुण्यांमध्ये ‘कोरोना’ची चर्चा सुरू झाली. मेहकर (जि. बुलडाणा) येथील प्राचार्य प्रतापराव देशमुख यांनी वेगळाच प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. कोरोनामुळे शासनाने गर्दी व यात्रा आदी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आपण साखरपुड्यातच लग्न आटोपले तर चालेल का, असा प्रस्ताव त्यांनी सर्वांपुढे मांडला. त्यावर दोन्ही बाजूंनी होकार आला. जेवढे पाहुणे, नातेवाईक साखरपुड्यासाठी हजर होते, त्यांच्या साक्षीनेच हा छोटेखानी पण आदर्श विवाह सोहळा पार पडला. वाजंत्री नाही, आहेर नाही, मानपान नाही. कोणताही बडेजाव न करता पुसद तालुक्यातील सावंगी येथील बाळू देशमुख यांनी मंगलाष्टके व लग्नविधी पार पाडले. 

-----------------मराठा सेवा संघाचे विचार आम्ही आत्मसात केले असून अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांना आदर्श मानतो. त्याच पद्धतीने मुलीचे लग्न व्हावे, असे वाटत होते. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी आम्ही जास्त लोकांना आमंत्रित न करता साखरपुड्यातच लग्न उरकून घेतले.- डॉ. गणेश कदम, नववधू दिपालीचे वडील

-----------------आमचे शेतकरी कुटुंब असून एकुलता एक मुलगा शुभम याचे लग्न बºयापैकी व्हावे अशी इच्छा होती. १४ मे ही लग्नाची तारीख ठरली होती. मात्र कोरोनामुळे शासनाने जमाव, यात्रा आदींवर बंदी घातली आहे. त्याला प्रतिसाद म्हणून साखरपुड्यातच साध्या पद्धतीने विवाह उरकला.- किसनराव अवचार, नवरदेव शुभचे वडील

टॅग्स :Yavatmalयवतमाळ