शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

९५० वर्षांपूर्वीचे मनदेव देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:09 IST

यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.

ठळक मुद्देआज श्रावण सोमवार : हेमाडपंथी शिवालयात भाविकांची मांदियाळी

शिवानंद लोहिया ।लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.प्राचीन वास्तूकलेचा अप्रतीम नमुना म्हणून या मंदिराकडे बघितले जाते. रामदेव राय यादव यांच्या कालखंडात ११५५ मध्ये या मंदिराची निर्मिती झाल्याचे आढळून येते. रामदेव राय यादव यांचे पंतप्रधान हेमांद्री पंत यांनी हे मंदिर बांधल्याची नोंद नांदगाव खंडेश्वर येथील मंदिरावर असलेल्या शिलालेखात आढळते. महादेवाच्या साडेतीन पीठांपैकी मनदेव हे एक पीठ आहे. या मंदिरात सुमारे १५० वर्षांपूर्वी पुजारी म्हणून रेवा भारती कार्य करीत होते. त्यांची मंदिराजवळ समाधी आहे. त्यावर महादेवाची पिंड ठेवण्यात आली होती. नंतर तेथे वाढलेल्या वटवृक्षामुळे हे पिंड गडप झाली आहे. यानंतर झाडाच्या आसपासचा भाग कापून मोकळा केला, असे पुजारी महादेव राऊत यांनी सांगितले.मंदिराच्या पूर्वेस कालभैरवाची मूर्ती आहे. उत्तर आणि दक्षिणेस सभागृह आहे. येथेच साईबाबांचे मंदिर आहे. मंदिरामागे तीर्थकुंड आहे. पूर्वेकडे मारुतीचे मंदिर तर आकाशाच्या छताखाली नागराज विराजमान आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी उसळते.

टॅग्स :Templeमंदिर