शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बायको घरी येत नाही म्हणून युवकाने पोलिस ठाण्यापुढे घेतले विष

By अविनाश साबापुरे | Updated: June 26, 2023 12:09 IST

पुसदमधील प्रकार : गुन्हा दाखल, उपचार सुरू

पुसद (यवतमाळ) : बायको माझ्यासोबत यायला तयार नाही, अशी आरडाओरड करीत एका युवकाने चक्क पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले. पोलिसांनी या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचावर उपचारा सुरू आहेत. येथील वसंतनगर पोलिस ठाण्याच्या पुढे हा प्रकार घडला.

बादल देवसिंग चव्हाण (३२) रा. देवतांडा सांडवा-मांडवा, असे या युवकाचे नाव आहे. तो रविवारी वसंतनगर पोलिस ठाण्याच्या आवारात दाखल झाला आणि जोरजोरात ओरडू लागला. ‘माझी नाणी सासू माझ्या बायकोला माझ्यासोबत माझ्या घरी पाठवत नाही. बायकोसुद्धा माझ्यासोबत घरी यायला तयार नाही’, असे ओरडत त्याने अचानक खिशातून विषाची बॉटल काढून विष प्राशन केले.

पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या आतच सदर घटना घडल्यामुळे खळबळ उडाली. त्याला तत्काळ येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदर युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश रामचंद्र इंगळे यांच्या फिर्यादीवरून कलम ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारYavatmalयवतमाळ