शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’चे काम ढेपाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 21:29 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देअधिकारी वसुलीवर : एकाचवेळी आठ कर्मचाऱ्यांना रजा मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.कर्मचारी नसल्याने कामे ठप्प पडल्याची ओरड या विभागाकडून केली जाते. अभियंत्यांपासून ते शिपायापर्यंतची अनेक पदे या विभागात रिक्त आहे. २० ते २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम ढकलले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी असलेले लिकेज दिवसच नव्हे तर कित्येक महिने काढले जात नाही. यातून पाणी धो-धो वाहते. नळ जोडण्या देण्यात आलेल्या ग्राहकांना १२ महिने ते दोन वर्षपर्यंत देयक पाठविले जात नाही. एकाचवेळी दोन ते तीन हजारांचे बिल त्यांच्या माथी मारले जाते. त्यातही व्याज घेण्यात येते.सध्या प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपये ग्राहकांकडे थकीत आहे. मार्च महिना तोंडावर असल्याने वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू घरोघरी फिरत आहे. त्यांना ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. ही सर्व धावपळ सुरू असताना तब्बल सात ते आठ कर्मचारी एकाचवेळी रजेवर गेले आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्यानंतरही सोमवार आणि मंगळवारीही सदर कर्मचारी कार्यालयात हजर झालेले नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न आहे. येथील कार्यकारी अभियंता सोमवारी आणि मंगळवारी अकोल्याचा कारभार सांभाळतात. उर्वरित दिवस यवतमाळ येथे असतात. हीच संधी साधून कर्मचारी सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. मात्र यापासून अधिकारी अनभिज्ञ कसे हा प्रश्न आहे. मात्र या सर्व प्रकारात कामकाजावर परिणाम होत आहे.लोकांचे प्रश्न अधांतरीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आपल्या समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांना कुठलाही अधिकारी उपलब्ध होत नाही. मंगळवारी कार्यकारी अभियंता नव्हते. उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता वसुलीवर असल्याचे सांगण्यात आले. इतर कर्मचारी गप्पांमध्ये रंगले होते. अशावेळी समस्या मांडायच्या कुणाकडे हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.