शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’ची यंत्रणा ढेपाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:22 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा कमालीची ढेपाळली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊ करत कामे पुढे ढकलली जात आहे.

ठळक मुद्देखापर विकास कामांवर : टंचाईतही पाणी वाहते धो धो, दुरुस्ती तकलादू

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा कमालीची ढेपाळली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊ करत कामे पुढे ढकलली जात आहे. शिवाय दुरुस्तीची कामे तकलादू केली जात असल्याने टंचाईच्या काळातही धो धो पाणी वाहत आहे. जागरूक नागरिकांनी केलेल्या सूचना झिडकारल्या जात आहे. पुढील काही महिन्यात शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. प्राधिकरणाच्या कामात सुधारणा न झाल्यास शहरावर मोठे जलसंकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी मोठमोठ्या मशीनरीजचा वापर केला जात आहे. ही कामे करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भारत संचार निगम याशिवाय विविध खासगी कंपन्यांचे भूमिगत जाळे तुटत असल्याने सेवा विस्कळीत होत आहे. विकास कामांसाठी होणारा त्रास नागरिकांकडूनही सहन केला जात आहे. मात्र सरकारी यंत्रणेच्या चांगल्याच जीवावर येत असल्याचे काही बाबीवरून दिसून येत आहे. केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे.खोदकाम होत असलेल्या प्रत्येक भागात प्राधिकरणाची पाईपलाईन फुटत आहे. त्यातून पाणी वाहण्यासोबतच पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. काही जागरुक नागरिकांकडून याची माहिती दिल्यानंतर प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून दुरुस्तीचे काम फुरसतीने हाती घेतले जाते. दुरुस्तीचे कामेही तकलादू केली जातात. दुसºया-तिसºया दिवशी झालेल्या कामाचे पितळ उघडे पडते. आर्णी रोडवर खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. या भागातील लोकांनी प्राधिकरणाला सूचना केली. तत्काळ दुरुस्ती करून वाहणारे पाणी थांबविण्याची तसदी प्राधिकरणाने घेतली नाही. दुसऱ्या दिवशी डागडूजी करण्यात आली. त्याच ठिकाणी जोड तुटला. पुन्हा पाण्याची गंगा वाहणे सुरू झाले. स्टेट बँक चौकातील पाईप दुरुस्तीचा कामाला तर चक्क आठवडा लावण्यात आला. नागरिकांनी तगादा लावल्यानंतर याठिकाणची नळ दुरुस्ती करण्यात आली.कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, हे वास्तव आहे. परंतु बहुतांश कामे कंत्राटदारांमार्फत केली जात आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवण्याइतकेही मनुष्यबळ या विभागाकडे नाही काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. लहान-लहान कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा बाऊ केला जात आहे. शिवाय नागरिकांनी केलेल्या सूचनांवर अंमल करण्याचेही सौजन्य दाखविले जात नाही. ही परिस्थिती असेल तर या विभागाला आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याच गरज व्यक्त होत आहे.