शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीचे प्रमाणपत्र जपून ठेवा! अनिवार्य होण्याची शक्यता; विमा, पासपोर्टसाठी सक्ती शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 07:12 IST

नजिकच्या भविष्यात आरोग्य विमा कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले जाण्याची दाट शक्यता आहे. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेलमध्ये ॲडमिशन, ऑपरेशन आदींच्या वेळीही कोराेना लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज भासण्याची शक्यता आहे.  प्रमाणपत्राशिवाय विम्याचा लाभ न मिळण्याची किंवा प्रीमियमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यवतमाळ: सध्या कोरोनाची लस घेण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र पुढील काळात अत्यंत आवश्यक ठरणार असल्याने ते जपून ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. (maintain the Corona Vaccine Certificate! Likely to be mandatory)आरोग्य विभागामार्फत सध्या मोफत तसेच काही खासगी केंद्रामध्ये सशुल्क कोरोना लस दिली जात आहे. कोरेानाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यासाठी नागरिकही जबाबदारीने गर्दी करत आहेत. मात्र, लस घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. तर लसीकरणानंतर मिळणारे प्रमाणपत्र किंवा पोचपावती जपून ठेवण्याचीही गरज आहे. 

प्रीमियमध्ये वाढ?नजिकच्या भविष्यात आरोग्य विमा कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले जाण्याची दाट शक्यता आहे. लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, हॉटेलमध्ये ॲडमिशन, ऑपरेशन आदींच्या वेळीही कोराेना लसीकरणाच्या प्रमाणपत्राची गरज भासण्याची शक्यता आहे.  प्रमाणपत्राशिवाय विम्याचा लाभ न मिळण्याची किंवा प्रीमियमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अधिकारी म्हणतात...- यासंदर्भात एलआयसीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा दिला. विशेषत: खासगी विमा कंपन्यांकडून मेडिक्लेम पाॅलिसीकरिता कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र मागितले जाणार आहे. - एलआयसीच्या जीवन आरोग्य विम्यासाठीही ते गरजेचे ठरणार आहे, असे एलआयसीच्या मार्केटिंग विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, वरिष्ठ शाखा प्रबंधक दिलेश बागडे म्हणाले की, सध्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक केलेले नाही. परंतु, गाईड लाईन बदलतात. यापुढे त्यात बदल होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळ