शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इस्रोमध्ये चमकली महाराष्ट्रकन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 17:19 IST

इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर स्पेस कॉम्पीटीशन’ आयोजित केली होती. इस्रोने दोन हजार २९८ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ८१ मुली आहेत, हे विशेष.

ठळक मुद्देसायबर स्पेस स्पर्धांमध्ये दाखविली विचारांची प्रगल्भता

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्राच्या मातीत विचारांची ताकद आणि भवितव्याचा वेध घेण्याची क्षमता ठासून भरली आहे. त्याचाच वारसा सांभाळत येथील गुणवंत विद्यार्थिनींनी चक्क इस्रोच्या स्पर्धेत देशभरातील विद्यार्थ्यांना मागे टाकत प्रगल्भ बुद्धिमत्तेचा परिचय दिला.पुढच्या दोन दशकात अंतराळात कोणती आव्हाने येतील, असा प्रश्न उपस्थित करत इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) देशभरातील विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर स्पेस कॉम्पीटीशन’ आयोजित केली होती. जुलैमध्ये झालेल्या या स्पर्धांचा निकाल निकाल शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला.

विविध राज्यातील लाखो सहभागी विद्यार्थ्यांपैकी पाच गटातून इस्रोने दोन हजार २९८ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून त्यात निम्म्याहून अधिक म्हणजे ८१ मुली आहेत, हे विशेष. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, मुंबई-पुण्यासह चक्क पाटणबोरी, यवतमाळ, अकोला, तुकूम चंद्रपूरसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी या संशोधनात्मक स्पर्धेत यशश्री पटकावली.यवतमाळातील तिघांची भरारीइस्रोने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध, क्विझ स्पर्धा घेतली. यात यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील रेड्डी कॉन्व्हेन्टची गौरी सुरेश रेड्डी, यवतमाळ येथील अ‍ॅग्लो हिंदी ज्युनिअर कॉलेजची श्रावणी संजय देशपांडे व नंदूरकर विद्यालयाचा देवांश गोपाल कदम या तिघांची उत्तम स्पर्धक म्हणून निवड करण्यात आली. अंतराळातील प्रदूषण, तेथील संशोधन, भविष्यातील संधी आदी विषयांवर त्यांनी विचार मांडले.यापूर्वी अंतराळ मोहिमांमध्ये देशा-देशात स्पर्धा होती. परंतु पुढच्या दोन दशकात खासगी कंपन्यांमध्ये अंतराळ मोहिमांची स्पर्धा दिसणार आहे. तेथील मौल्यवान धातू आणि खनिजे मिळविण्यासाठी आतापासूनच कंपन्या सरसावल्या आहेत. त्यातून अंतराळातील प्रदूषण वाढीसोबतच तेथील पर्यटनाच्या आणि शेतीच्या संधी कमी होतील, हा धोका मी माझ्या निबंधात वर्तविला.- गौरी सुरेश रेड्डी, पाटणबोरी (विजयी विद्यार्थिनी)

टॅग्स :isroइस्रो