शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : सात मतदारसंघात ८७ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 05:00 IST

आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न केले गेले. गोंड समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावे हा या मागचा काँग्रेसचा हेतू आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : ३९ उमेदवारांची माघार, सर्वाधिक उमरखेडच्या १४ उमेदवारांनी मैदान सोडले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी नामांकन मागे घेण्याच्या दिवशी जिल्हाभरात एकूण ३९ उमेदवारांनी मैदान सोडले. कुणी श्रेष्ठींच्या आदेशाचा सन्मान केला तर कुणाला भविष्यातील तडजोडींचे आश्वासन दिले गेले.जिल्ह्यातील विधानसभेच्या सात मतदारसंघासाठी सव्वाशेवर उमेदवारांचे नामांकन छाननी अंती कायम राहिले होते. यातील अडचणीच्या ठरणाऱ्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्याचवेळी सत्ताधाऱ्यांना अडचणीचे वाटणारे हे उमेदवार विरोधी पक्षांना मात्र सोईचे होते. म्हणून त्यांनी या उमेदवारांना रिंगणात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले तर काही उमेदवार हातचे निघून गेले. सर्वाधिक १४ उमेदवारांनी उमरखेड मतदारसंघातून माघार घेतली आहे. तर सर्वात कमी एक उमेदवार वणीमध्ये मैदानातून बाहेर पडला. आजच्या घडीला सर्वाधिक १९ उमेदवार वणी मतदारसंघात रिंगणात असून सर्वात कमी प्रत्येकी १० उमेदवार उमरखेड व दिग्रस मतदारसंघात कायम आहे. वणी मतदारसंघात पंचरंगी सामना होण्याची चिन्हे आहे. राळेगाव, पुसदमध्ये दुहेरी तर उमरखेड, आर्णी, यवतमाळ व दिग्रस मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची स्थिती दिसू लागली आहे.आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्तीचे प्रयत्न केले गेले. गोंड समाजाच्या मतांमध्ये विभाजन व्हावे हा या मागचा काँग्रेसचा हेतू आहे. अखेर हा हेतू साध्य करण्यात व तोडसाम यांना रिंगणात कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले आहे. तेथे काँग्रेसची लढत भाजप बंडखोरांशी तर होणार नाही ना अशी शंकाही राजकीय गोटात व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या घाटंजी येथील नगराध्यक्ष नयना शैलेश ठाकूर, आर्णी येथील अमोल मंगाम यांनीही नामांकन दाखल केले होते. मात्र सोमवारी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक गजानन इंगोले तर दिग्रस मतदारसंघात भाजपचे अजय दुबे यांनी रिंगणातून माघार घेतली. उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राजेंद्र नजरधने, भाविक भगत यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा सन्मान राखत मैदान सोडले. अडचणीचे ठरणाºया अनेक उमेदवारांचे वेळेपर्यंत नामांकन मागे घेण्यात सत्ताधाºयांना यश आले नसले तरी अजूनही त्यांनी पाठपुरावा सोडलेला नाही. अनेक ठिकाणी उमेदवार बसवून त्याचा पाठिंबा मिळविण्याचाही प्रयत्न अखेरपर्यंत होणार आहे.विधानसभेच्या या निवडणुकीत मंत्री भाजपचे प्राचार्य डॉ. अशोक उईके, मदन येरावार, शिवसेनेचे संजय राठोड या तिघांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. राठोड हे आपले एक लाखांवर मतांच्या आघाडीचे उद्दीष्ट गाठू शकतात की त्यांची आघाडी कमी होते हे पाहणे महत्वाचे आहे. २०१४ ला जिंकलेल्या पाचही जागा भाजप २०१९ च्या निवडणुकीत कायम ठेऊ शकते का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. पुसद विधानसभा मतदारसंघाची लढत लक्षवेधी ठरणार आहे. कारण तेथील निवडणूक भाऊबंदकीत लढली जात आहे. भाजपकडून आमदार नीलय नाईक तर राष्टÑवादीकडून विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील यांना रिंगणात उतरविले गेले आहे. या मतदारसंघात बहुसंख्य असलेले बंजारा समाज बांधव नव्या चेहºयाला संधी देतात की नीलय नाईकांना वरच्या सभागृहातून खालच्या सभागृहात पाठवितात हे पाहणे महत्वाचे ठरते.मतदारसंघनिहाय रिंगणातील उमेदवारवणी : १९, उमरखेड : १०, पुसद : ११, यवतमाळ : १३, दिग्रस : १०, राळेगाव : १३, आर्णी : ११- एकूण उमेदवार ८७मतदारसंघनिहाय ‘विड्रॉल’ उमेदवारवणी : ०१, उमरखेड : १४, पुसद : ०८, यवतमाळ : ०२, दिग्रस : ०५, राळेगाव : ०५, आर्णी : ०४- एकूण उमेदवार ३९ढवळेंना अंगठी तर देशमुखांना कपबशीनिवडणुकीच्या रिंगणात बंडखोर म्हणून दंड थोपटलेल्या उमेदवारांना नेमके कोणते निवडणूक चिन्ह मिळाले याची उत्सुकता मतदारांमध्ये कायम आहे. यवतमाळ मतदारसंघात शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांना अंगठी तर उमरखेडचे सेना बंडखोर डॉ. विश्वनाथ विणकरे यांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे. दिग्रस मतदारसंघातील भाजप बंडखोर संजय देशमुख यांना कपबशी, आर्णीतील भाजप बंडखोर राजू तोडसाम यांना पेटी तर वणीतील शिवसेना बंडखोर विश्वास नांदेकर यांना हेलिकॉप्टर, सुनील कातकडे यांना बकेट चिन्ह मिळाले आहे. ही चिन्हे शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे या अपक्ष बंडखोरांपुढे आव्हान आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ