शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

Maharashtra Election 2019 ; मतविभाजनाने राजकीय समीकरणे बिघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी भाजपने दोन जागांवर, काँग्रेसने एका जागेवर तर राष्ट्रवादीने दोन जागांवर चेहरे बदलविले आहे. भाजपने तर आपल्या दोन आमदारांचेच तिकीट कापून तेथे नवे चेहरे रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीत मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे.

ठळक मुद्देपाच विधानसभा मतदारसंघ : सर्वाधिक वणी, आर्णीमध्ये, बंडखोरीचाही पक्षांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील सात पैकी पाच विधानसभा मतदारसंघात अपक्षांमुळे मतविभाजन अटळ असून त्यामुळे विद्यमान आमदारांचे राजकीय समीकरण बिघडणार आहे. त्यातही सर्वाधिक फटका हा बहुरंगी लढत होऊ घातलेल्या वणी मतदारसंघात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तेथे नेमका कोण निवडून येईल याचा अंदाज वर्तविणे राजकीय तज्ज्ञांनाही सध्यातरी कठीण झाले आहे.जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी भाजपने दोन जागांवर, काँग्रेसने एका जागेवर तर राष्ट्रवादीने दोन जागांवर चेहरे बदलविले आहे. भाजपने तर आपल्या दोन आमदारांचेच तिकीट कापून तेथे नवे चेहरे रिंगणात उतरविले आहे. या निवडणुकीत मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे.विधानसभेच्या अन्य पाच मतदारसंघात मात्र मतविभाजन निश्चित आहे. वणीमध्ये सात उमेदवार रिंगणात आहे. या मतदारसंघात कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. परंतु या समाजाचे पाच उमेदवार रिंगणात असल्याने मतविभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचा फायदा नेमका भाजपला होतो की काँग्रेसला हे पाहणे महत्वाचे ठरते. अशीच स्थिती आर्णी विधानसभा मतदारसंघात आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने या मतदारसंघात आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी बंडखोरी केली आहे. या मतदारसंघात आदिवासी आणि त्यातही गोंड समाजाचे प्राबल्य आहे. या समाजाचे पाच उमेदवार रिंगणात आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात मतविभाजनाची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होण्याचा अंदाजही वर्तविला जात आहे.जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघातसुद्धा मोठ्या प्रमाणात हक्कांच्या मतांमध्ये विभाजन दिसते आहे. शिवसेनेचे बंडखोर संतोष ढवळे रिंगणात आहे. ते युतीच्या हक्कांच्या मतांमध्ये विभागणी करतील. त्यांना समाजाने साथ दिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराला काही प्रमाणात का होईना नुकसान संभवते. प्रहारचे बिपीन चौधरी यांना मिळणारी मते नेमकी कुणाला मायनस करतील याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर यांना पक्ष व मतदारांची किती साथ मिळते याकडे नजरा लागल्या आहेत. कारण त्यांना मिळणारी मते ही काँग्रेसची हक्काची मते असल्याचे मानले जाते. परंतु तुटलेला संपर्क, ऐनवेळेवरील उमेदवारीमुळे मतदारांपर्यंत ओळख निर्माण करण्याचे आव्हान वंचितच्या उमेदवारापुढे आहे.दिग्रस विधानसभा मतदारसंघात भाजप बंडखोर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या उमेदवारीने शिवसेनेची डोकेदुखी वाढविली आहे. सेना व राष्ट्रवादी न चालणाऱ्या मतदारांसाठी तिसरा पर्याय उभा झाला आहे. राष्ट्रवादीचे मो.तारिक मो. शमी दिग्रस मतदारसंघासाठी नवे आहेत. तरीही त्यांना कितपत पसंती मिळते याकडे नजरा आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या हक्काची मते भाजप बंडखोराकडे जाण्याची व त्यामुळे शिवसेनेचे एक लाखांवर मतांच्या आघाडीचे स्वप्न भंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राजेंद्र नजरधने यांचे तिकीट कापून नगराध्यक्ष नामदेव ससाने या नव्या चेहºयाला रिंगणात उतरविले आहे. मात्र भाजपच्या या उमेदवारापुढे शिवसेना बंडखोर डॉ. विश्वनाथ विणकरे यांचे आव्हान आहे. तेथे काँग्रेसचे विजय खडसे यांची लढत भाजपशी होते की सेना बंडखोराशी याकडे नजरा लागल्या आहे. वंचित बहुजन आघाडी, बसपाचा उमेदवार येथे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो.भाजप उमेदवाराचे ‘रिमोट’ मालकाच्या हातीआर्णी विधानसभा मतदारसंघात भाजपने ‘मालका’च्या इशाºयावर उमेदवार दिल्याने पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहे. उमेदवार हा भाजपचा नव्हे तर मालकाचा असा प्रचार केला जात आहे. गेली दहा वर्ष मतदारसंघ वाºयावर सोडणे, भाजप सोडून सेनेत प्रवेश, आता पुन्हा भाजपात एन्ट्री याबाबीही भाजपच्या उमेदवारासाठी अडचणीच्या ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघात आमदार तोडसाम यांची बंडखोरी काँग्रेसच्या पथ्थ्यावर पडू शकते, असा राजकीय अंदाज आहे.राळेगाव, पुसद विधानसभा मतदारसंघाचा अपवादराळेगाव आणि पुसद हे दोन मतदारसंघ मतविभाजनासाठी जणू अपवाद ठरले आहे. राळेगावमध्ये भाजपचे प्राचार्य डॉ. अशोक उईके व काँग्रेसचे प्रा. वसंत पुरके या आजी-माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत होत आहे. पुसदमध्ये नीलय नाईक व इंद्रनील नाईक या दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये समोरासमोर लढत होत आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ