शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

Maharashtra Election 2019 : राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला.

ठळक मुद्देराज ठाकरे : वणी येथे मनसे उमेदवारांसाठी पार पडली प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : देशात, राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून ही मनमानी थांबविण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. हा विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी येथे केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आज संकटात आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही बाब अभिमानाची नसल्याचेही त्यांनी सांगितले. आजही शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतच असल्याचे ते म्हणाले. एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एका शेतकऱ्याने ‘हे माझं सरकार’ असा मजकूर लिहून असलेलं टी शर्ट घालून आत्महत्या केली. काय चाललयं या राज्यात? असा सवाल करीत निवडणुकांना तुम्ही गंमत समजत असाल तर तुमचा आवाज असाच दाबला जाईल. त्यामुळे आजच जागे व्हा, असे आवाहनही ठाकरे यांनी उपस्थिताना केले.जोपर्यंत सक्षम विरोधी पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत सत्ताधाऱ्यांची मनमानी थांबणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळेच मला एक सक्षम विरोधी पक्ष तयार करायचा आहे. त्यासाठी आता मला तुमची साथ हवी आहे. नोटबंदीमुळे देशात मंदी आली असून त्यामुळे विविध उद्योगातून कर्मचाºयांना काढून टाकले जात आहे. यापुढे ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढले जाणार आहे. त्यामुळे आजच सावध व्हा, असेही ठाकरे यांनी सांगितले. तत्पूर्वी मनसेच्या उमेदवारांचीही भाषणे झालीत. यावेळी व्यासपिठावर मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, आनंद एंबडवार, ज्येष्ठ नेते विठ्ठल लोखंडकर, अनिल शिदोरे, वरोराचे रमेश राजूरकर, राजूराचे महालिंग कंठाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिसांना पाणी द्यासत्तेवर येण्यापूर्वी पोलिसांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. सुटल्या का समस्या, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न आजही कायम असल्याचे सांगून कायदा व सुव्यवस्था राखणाºया पोलीस बांधवाची देखील सत्ताधाऱ्यांनी प्रतारणा केली, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मनसेचे काही कार्यकर्ते सभास्थळी पाण्याच्या बॉटल वितरीत करीत होते. नेमका हाच धागा पकडून ठाकरे यांनी पाण्याच्या बॉटल आधी पोलीस बांधवांना द्या, अशा सुचना कार्यकर्त्यांना केल्या, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ