शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; मतदानाच्या दीड तासापूर्वी ईव्हीएमची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष करून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने मॉक पोल प्रमाणपत्र तयार केले जाते.

ठळक मुद्दे‘मॉक पोल’ प्रमाणपत्र अनिवार्य : सकाळी ५.३० वाजता सुरू होणार प्रक्रिया

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ईव्हीएमबाबत अनेक शंकाकुशंका उपस्थित होत असताना मतदानाची प्रक्रिया पारदर्शकरीत्या सुरू केली जाते. यासाठी ‘मॉक पोल’ प्रमाणपत्र व अभिरुप मतदान घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर दीड तासापूर्वी अभिरुप मतदान करून ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी केली जाणार आहे.मतदान प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ईव्हीएममध्ये उमेदवाराला दिलेले मत योग्य पद्धतीने नोंदले जाते की नाही, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठी व ईव्हीएममधील मत याची पडताळणी केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला ‘मॉक पोल’ संबोधल्या जाते. याची सुरुवात अभिरुप मतदान घेऊन होते. रिंगणात असलेले एकूण उमेदवार व नोटा या सर्वांना समान मतदान करून नंतर त्याची पडताळणी केली जाते. ही प्रक्रिया किमान दोन उमेदवाराचे प्रतिनिधी असताना सुरू केली जाते. सकाळी ५.३० वाजता मॉक पोलची वेळ निश्चित केली आहे.उमेदवारांचे प्रतिनिधी गैरहजर असल्यास मतदान केंद्र प्रमुख व मतदान कर्मचारी यांच्या उपस्थितीत मॉक पोल केला जातो. या सर्व उमेदवारांना समान मते टाकून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ईव्हीएममधून झालेले मतदान डिलीट केले जाते. ही प्रक्रिया सर्वांसमक्ष करून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षरीने मॉक पोल प्रमाणपत्र तयार केले जाते.या प्रमाणपत्रानंतरच सकाळी ७ वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतदानाच्या दीड तासापूर्वी पुढील मतदान योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठीच मॉक पोल घेतला जातो. एकंदर प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे निर्देश आयोगाकडून असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले.किमान ५० मते टाकणे बंधनकारकमॉक पोल व अभिरुप मतदानासंदर्भात उमेदवाराने नेमलेल्या मतदान केंद्र प्रतिनिधीच्या कार्यशाळेत माहिती दिली जाते. तसेच या सर्व प्रतिनिधींना सकाळी ५.३० वाजता मतदान केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यांच्या समक्षच किमान ५० मते समान पद्धतीने टाकून पडताळणी केली जात असल्याची माहिती यवतमाळ विधानसभा निवडणूक अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी दिली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळEVM Machineएव्हीएम मशीन