शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; स्वत:चे घर भरणाऱ्यांना दिवाळीपूर्वी साफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

स्मृती इराणी म्हणाल्या की, भाजपने जनतेच्या आशीर्वादाने सत्तेला सेवेचा मार्ग बनविला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी युवा मोर्चात असताना आम्ही संघर्ष केला आता छत्रपती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून २४ हजार कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्पपूर्ण केला. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून दहा कोटी परिवारांना उपचार खर्च केला जात आहे.

ठळक मुद्देस्मृती इराणी । भाजपची प्रचार सभा, विरोधकांचे नेतृत्वच दिशाहीन झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्तेचा उपयोग स्वत:चे घर भरण्यासाठी करणाºया राजकीय पक्षाचा व त्यांच्या विचाराचा सफाया करण्याची हीच वेळ आहे. दिवाळीपूर्वी महाराष्ट्राला मतदान करून राष्ट्राला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केले. त्या पोस्टल मैदानात शनिवारी आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.स्मृती इराणी म्हणाल्या की, भाजपने जनतेच्या आशीर्वादाने सत्तेला सेवेचा मार्ग बनविला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी युवा मोर्चात असताना आम्ही संघर्ष केला आता छत्रपती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून २४ हजार कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्पपूर्ण केला. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून दहा कोटी परिवारांना उपचार खर्च केला जात आहे. ६० लाख शौचालये तयार करून आया-बहिणींची होणारी कुचंबना थांबविली आहे असा दावा त्यांनी केला.दोन लाख ५० हजार महिला बचत गट तयार करून त्यांना दोन लाख करोड रुपयाचे अर्थसहाय्य दिले आहे. या उलट विरोधकांचे नेतृत्वच दिशाहीन झाले असून ते देशाला काय दिशा देणार असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. लक्ष्मीचे आगमन होण्यापूर्वी आपण साफसफाई करतो.तसेच स्वार्थी विचारांच्या पक्षांना साफ करा म्हणजे आपल्या भागात समृद्धी येईल खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करता येईल, असे आवाहन स्मृती इराणी यांनी केले. यवतमाळच्या विकासाची मोठी यादी येथील उमेदवार मदन येरावार यांनी आपल्या पुढे मांडली असल्याचेही सांगितले.यावेळी किशोर तिवारी, मदन येरावार यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, पंचायत समिती सभापती गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनोद खोडे, किशोर जोतवाणी, नगरसेवक संदीप तातेड, संजय रंगे, सुजित मुनगीनवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळSmriti Iraniस्मृती इराणी