शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र विधानसभेत तब्बल ६ बापूराव तर २४ बापूरावपुत्रांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:07 IST

१९६२ ते २०१९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतला, तर नावात बापूराव असलेल्या तब्बल ३० आमदारांनी लोकांच्या मनावर गारुड केल्याचे दिसते.

ठळक मुद्देआगळे नाममहात्म्य

लोकमत न्यूज नेटवर्कअविनाश साबापुरेयवतमाळ : आला बापूराव आता आला बापूराव..! हे गाणं गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर बापूराव हे नाव गेल्या ५७ वर्षांपासून विधीमंडळाचे सभागृह गाजवित आहे. १९६२ ते २०१९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतला, तर नावात बापूराव असलेल्या तब्बल ३० आमदारांनी लोकांच्या मनावर गारुड केल्याचे दिसते.१९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर दोनच वर्षात विधानसभेची पहिली निवडणूक घेतली गेली. या पहिल्या निवडणुकीपासून सुरू झालेले बापूराव या नावाचे राजकीय महात्म्य आजतागायत कायम असल्याचे दिसते. नावात बापूराव वागविणारे तब्बल ३० जण आजपर्यंत आमदार झाले आहेत. त्यात सहा जण थेट बापूराव आहेत. तर २४ जणांच्या पिताश्रीचे नाव बापूराव आहे. पहिल्या विधानसभेत उदगीर मतदारसंघातून विठ्ठलराव बापूराव खडीवाले, वध्यार्तून बापूराव मारोतराव देशमुख, तर यवतमाळातून जांबूवंतराव बापूरावजी धोटे आमदार झाले. लगोलग १९६७ च्या निवडणुकीतही जांबूवंतराव बापूरावजी धोटे विजयी झाले. त्याचवेळी अकोले (अहमदनगर) मतदारसंघातून बापूराव कृष्णाजी देशमुख आमदार झाले होते. १९७२ मध्ये उदगीरचे विठ्ठलराव बापूराव खडीवाले पुन्हा एकदा आमदार झाले. १९७८ च्या निवडणुकीत पुन्हा तीन आमदार नावात बापूराव घेऊन सभागृहात पोहोचले. यवतमाळातून जांबूवंतराव बापूरावजी धोटे, वणीतून (यवतमाळ) बापूराव हरबाजी पानघाटे आणि वलगावमधून (अमरावती) अंबादास बापूराव साबळे हे तिघे यावेळी आमदार झाले. पुलोदचे सरकार जाऊन दोनच वर्षात १९८० मध्ये निवडणुका झाल्या. यातही पुन्हा एक बापूराव आणि दोन बापूरावपुत्र निवडून आले. त्यात बापूराव हरबाजी पानघाटे, राजुराचे (चंद्रपूर) प्रभाकर बापूराव मामुलकर, वलगावचे अंबादास बापूराव साबळे यांनी बाजी मारली. १९८५ मध्ये प्रभाकर बापूराव मामुलकर यांचा फेरविजय झाला, तर हदगावमधून (नांदेड) बापूराव शिवराम आष्टीकर पाटील विजयी झाले. १९९० मध्ये वणीतून वामनराव बापूराव कासावार, बापूराव शिवराम आष्टीकर पाटील, बिलोलीमधून (नांदेड) भास्करराव बापूराव खतगावकर पाटील विजयी झाले. १९९५ मध्ये तर बापूराव नावाचा चौकार बसला. वणीतून वामनराव बापूराव कासावार, चिमूरमधून (चंद्रपूर) रमेशकुमार बापूराव गजबे, हदगावमधून सुभाष बापूराव वानखेडे आणि बिलोलीचे भास्करराव बापूराव खतगावकर पाटील सभागृहात पोहोचले. वामनराव बापूराव कासावार सुभाष बापूराव वानखेडे यांनी पुन्हा १९९९ मधील निवडणूक जिंकली. सुभाष वानखेडे आणि भास्करराव खतगावकर यांनी पुन्हा २००४ मध्येही आमदारकीत बाजी मारली. तर २००९ मध्ये वामनराव कासावार आणि वर्ध्याचे सुरेश देशमुख हे बापूरावपुत्र आमदार झाले. २०१४ मध्ये मात्र वणी मतदारसंघात बदल झाला. तेथे संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार विजयी झाले. तर हदगावमध्ये नागेश बापूराव आष्टीकर पाटील विजयी झाले. विशेष म्हणजे २०१९ मध्येही संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या रूपाने वणीने पुन्हा एकदा बापूरावपुत्रालाच आमदारकी बहाल केली.सर्वाधिक विदभार्तून, त्यातही यवतमाळचे वर्चस्वराजकारणात विभुतीपूजा काही नवी नाही, महाराष्ट्राच्या राजकारणात तर नेत्यांचे नाममहात्म्य अगदी विचारमहात्म्यालाही फिके पाडणारे आहे. १९६२ ते २०१९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास तब्बल ३० बापूराव किंवा बापूरावपुत्र महाराष्ट्रात आमदार झाले. यात विदभार्तून सर्वाधिक १८ वेळा या नावांनी आमदारकी पटकावली. त्यात दोन अमरावतीतून तीन वेळा चंद्रपूर जिल्ह्यातून झाले. तर चक्क ११ वेळा यवतमाळ जिल्ह्यातून बापूराव नाव धारण करणारे आमदार झाले. त्यात एकट्या वणी विधानसभा क्षेत्रातूनच ही वारंवारिता आठ वेळा घडली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019