शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महागांवची वात्सल्यसिंधू दायी छबूताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 22:39 IST

समाजात निरनिराळी माणसं बघायला मिळतात. त्यातील त्याग, समर्पण कराणाऱ्यांचे नाव आदराने घेतले जाते. येथील वात्सल्यसिंधू दायी छबूताई याच प्रकारात मोडतात.

ठळक मुद्देमहिलांची माऊली : प्रसूती वेदनांवर फुंकर, त्याग, समर्पणाची वृत्ती

दीपक वगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागांव कसबा : समाजात निरनिराळी माणसं बघायला मिळतात. त्यातील त्याग, समर्पण कराणाऱ्यांचे नाव आदराने घेतले जाते. येथील वात्सल्यसिंधू दायी छबूताई याच प्रकारात मोडतात.काही व्यक्ती अशा असतात, की समाज त्यांचे ऋण फेडूच शकत नाही. महागाव येथील छबूताई इंगोले त्यापैकीच एक. अत्यंत निस्वार्थ भावनेने त्या काम करतात. त्यामुळे त्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या आहे. गावात एखाद्या गर्भवतीचा पोटात कळ येताच तिच्या कुटुंबातील सर्वांना या माऊलीची आठवण येते. संपूर्ण परिसरात छबूताई परिचित आहे. सुखरुप बाळंतपण करून स्त्रियांची काळजी घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. आजवर त्यांनी शेकडो बाळंतपण सुखरूप पार पाडले. तब्बल ३० वषार्पांपासू त्या अविरत सेवा आहे.बाळंतपण करताना त्यांना कशाचीही अपेक्षा नसते. त्यांनी हा वारसा आई शेवंताबाईकडून घेतला. एका बाळंतीणीला त्या सतत सात दिवस सेवा देतात. स्वत: चंद्रमौळी झोपडीत वास्तव्य करूनही त्या बाळंतपणाच्या मोबदल्यात मिळेल ते आनंदाने स्वीकारतात. आत्तापर्यंत त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचादेखील लाभ मिळाला नाही. घरात अठरा विश्व दारिद्रय असल्याने छबूताई रोजमजुरी करून उदरनिर्वाह करतात.त्यांच्या मायाळू स्पर्शाने मात्र अनेक महिलांना उब मिळते. प्रसूती वेदना कमी होतात. मात्र छबूतार्इंच्या आयुष्यातील वेदना कधी संपणार, हा प्रश्न कायम आहे.