महागाव : तालुक्यातील हजारो केशरी राशन कार्डधारक गत अनेक वर्षांपासून शासनाचे धान्य मिळण्यापासून वंचित आहेत. या कार्डधारकांना जिल्हा प्रशासनाने तत्काळ धान्य उपलब्ध करुन द्यावे, या मागणीसाठी महागावच्या तहसील कार्यालयावर केशरी राशन कार्डधारकांनी विलास पाईकराव व रामकिसन खंदारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला.महागाव तालुक्यातील ११४ गावांमध्ये जवळपास दोन हजाराच्यावर केशरी राशन कार्डधारक गेल्या १० वर्षांपासून शासकीय धान्यापासून वंचित आहेत. त्यामुळे गोरगरीबांना महागडे धान्य विकत घेऊन आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करावे लागत आहे.त्यातच महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून, जगावे तरी कसे, असा प्रश्न या केशरी राशन कार्डधारकांसमोर उभा आहे. शासनाने अजुनही या कार्डधारकांना शासकीय धान्य उपलब्ध करून दिले नाही. यासोबतच अतिक्रमण धारकांना गांव नमुना आठ नसल्यामुळे शासनाच्या विविध घरकुल योजने पासुन वंचित रहावे लागत आहे. ही सुद्धा प्रमुख मागणी मोर्चेकºयांची होती.या मोर्चात विलास पाईकराव, रामकिसन खंदारे, सुभाष राठोड, गणेश खंदारे, मिलिंद कवडे, बीरबल राठोड, सत्यभामा सूर्यवंशी, माधव नेमाडे यांच्यासह असंख्य नागरिक सहभागी झाले होते. तहसीलदार इसाळकर यांनी याबाबत जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करून चावडी वाचनाद्वारा लाभार्थ्यांची चाचपणी करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले.
महागाव तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:31 IST
तालुक्यातील हजारो केशरी राशन कार्डधारक गत अनेक वर्षांपासून शासनाचे धान्य मिळण्यापासून वंचित आहेत.
महागाव तहसीलवर मोर्चा
ठळक मुद्देधान्यापासून वंचित : केशरी राशनकार्डधारकांना धान्य मिळावे