शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लम्पीचे देशभरात थैमान, ८२ हजार जनावरांचा मृत्यू

By रूपेश उत्तरवार | Updated: September 19, 2022 05:55 IST

राज्यात १८७ पशुधनाचा बळी, उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी

रूपेश उत्तरवारयवतमाळ : लम्पी चर्मरोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या रोगाने देशभरात ८२ हजार पशुधनाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील १८७ पशुधनाचा त्यात समावेश आहे. या आजाराला रोखण्यासाठी उपयुक्त औषधी खरेदी करताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून प्रत्येक जिल्ह्याला एक कोटींचा निधी उपलब्ध करून  देण्यात आला आहे. 

बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर अंतरात जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. यानुसार पशुसंवर्धन विभागाने अतिशय वेगाने लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात शासकीय पशुवैद्यक, खासगी पशुुवैद्यक, आंतरवासिता छात्र आदींना मदतीला घेण्यात आले आहे. राज्यात २,७३० जनावरे आजारातून बरी झाली आहेत. उपचारासाठी ४८ लाख लसीचे डोस उपलब्ध केले आहेत. आतापर्यंत १७ लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. दर दिवसाला एक लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मोफत औषधोपचार आणि लसीकरणलम्पी आजारासंदर्भात शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीमार्फत एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आजाराचा मानवाला धोका नाही. परंतु पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.- सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे

देशातील बळीराजस्थान - ५३,०६४ । पंजाब - १७,३१९ । गुजरात - ५,५५४हिमाचल प्रदेश - ३,२०९ । हरयाणा - २७५

nजळगाव -    ६४nअहमदनगर -    २४nधुळे -    ७nअकोला -    २८nपुणे -    १७nलातूर -     ३nसातारा -     ९nबुलडाणा -     १०nअमरावती -     १३nकोल्हापूर -     ७nसांगली -     १nवाशिम -    १nजालना -     १nठाणे -     १ nनागपूर -     १

(यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर)

टॅग्स :cowगायYavatmalयवतमाळ