शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

यात्रा मैदानांमध्ये बुडतोय कोट्यवधींचा जीएसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 10:19 IST

राज्यभर जिल्हा व तालुका मुख्यालयी सार्वजनिक मैदानांवर भरणाऱ्या यात्रांमध्ये कोट्यवधी रुपयांची नियमित उलाढाल होते. परंतु सर्व नगदीचा व्यवहार असल्याने ही उलाढाल रेकॉर्डवरच येत नाही.

ठळक मुद्दे‘प्राप्तीकर’चेही दुर्लक्षवार्षिक रोख उलाढालींचे रेकॉर्डच नाही

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभर जिल्हा व तालुका मुख्यालयी सार्वजनिक मैदानांवर भरणाऱ्या यात्रांमध्ये कोट्यवधी रुपयांची नियमित उलाढाल होते. परंतु सर्व नगदीचा व्यवहार असल्याने ही उलाढाल रेकॉर्डवरच येत नाही. त्यातूनच वार्षिक कोट्यवधी रुपयांचा जीएसटीप्राप्तीकर बुडतो आहे. स्थानिक शासकीय यंत्रणेच्या संगनमताने हा बुडवा कारभार खुलेआम सुरू आहे.जिल्हा मुख्यालय, तालुका मुख्यालय व मोठ्या गावांमध्ये असलेल्या सार्वजनिक मैदानांवर करमणुकीचे उपक्रम राबविले जातात. त्याला कुठे यात्रा, जत्रा, मिनाबाजार तर कुठे प्रदर्शनी म्हणून संबोधले जाते. यातील केवळ मैदान भाड्याने घेण्यापोटी भरल्या जाणारे शुल्कच तेवढे रेकॉर्डवर येते. मैदान ताब्यात घेतल्यानंतर तेथे मौत का कुआँ, झुले, रेल्वे गाडी, रशियन झुले, एरोप्लेन, फॅन्सी मशीन्स, हॉटेल, आईसक्रीम पार्लर, विविध स्टॉल्स, खेळ आदी ५० ते १०० प्रकारची वेगवेगळी दुकाने लावली जातात. तेथे एन्ट्रीसाठी शुल्क आकारले जाते. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पैसे घेतले जातात. शनिवार, रविवार व अन्य शासकीय सुट्यांच्या दिवशी तर या मैदानांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी असते.

कोट्यवधींचा ‘कच्चा व्यवहार’तेथील सर्व व्यवहार रोखीने होतात. पैशाची ही देवाणघेवाण ‘कच्चा व्यवहार’ असल्याने त्याची कुठे शासकीय दप्तरी नोंद होत नाही. पर्यायाने शासनाला त्यातून जीएसटी, प्राप्तीकरासारखा महसूल मिळत नाही. यातून राज्यभर भरणाऱ्या विविध यात्रांमध्ये शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतो आहे. शासनाच्या संबंधित स्थानिक यंत्रणेला मॅनेज करुन संगनमताने हा महसूल बुडविला जातो.

कर्नाटक, आंध्रातील खास लॉबीयात्रा भरविणारा कुणी तरी एक व्यक्ती मैदान भाड्याने घेतो. तो मग विविध स्टॉल्सधारकांना नफ्यात ३० टक्के मार्जीन ठेवून निमंत्रित करतो. कारवाईचे अधिकार असलेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका व ग्रामपंचायतींच्या यंत्रणा, पोलीस, राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते आदींना या जत्रा मैदानात खास व्हीआयपी पास दिल्या जातात. यात्रा मैदानात झुले लावणाऱ्यांची कर्नाटक, आंध्रातील खास लॉबी आहे. पावसाळ्यात हे झुलेधारक राजस्थानात निघून जातात.

डोळे विस्फारणारे आकडेयात्रा मैदानातील या वर्षभर चालणाऱ्या राज्यभरातीलच उलाढालीची सखोल चौकशी झाल्यास बुडणाऱ्या महसुलाचे डोळे विस्फारणारे आकडे शासनाच्या पुढे येतील, एवढे निश्चित. या उलाढालीला प्राप्तीकर व जीएसटी विभागाचे छुपे संरक्षण असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :GSTजीएसटी