शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

सावकार लुबाडतोय, बिनधास्त तक्रारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 21:54 IST

सावकार आपल्याला लुबाडत असेल, अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असेल तर त्याच्याविरुद्ध बिनधास्त तक्रारी करा, त्याच्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.

ठळक मुद्देउपनिबंधकांचे आवाहन : अवैध सावकारी शासकीय नियंत्रणाबाहेर, फायनान्सरही जुमानत नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सावकार आपल्याला लुबाडत असेल, अव्वाच्या सव्वा व्याज आकारत असेल तर त्याच्याविरुद्ध बिनधास्त तक्रारी करा, त्याच्यावर चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.यवतमाळ शहरात अवैध सावकारांचा प्रचंड धुडगुस सुरू आहे. बँकांना पर्याय म्हणून अवैध सावकारीतून ईकॉनॉमी चालविली जात आहे. अडचणीत असलेल्या, गरजूंना व्याजाचे अव्वाच्या सव्वा दर आकारुन कर्ज दिले जात आहे. दुप्पट-तिप्पट परतावा देऊनही मुद्दल कायम आहे. सावकारांच्या या बाजारात फिरणाऱ्या रकमेच्या वसुलीसाठी अनेकांनी गुंड पोसले आहेत. या गुंडांच्या माध्यमातून अवैध सावकारापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने गुंडांची व अवैध सावकारांचीसुद्धा पोलीस कुंडली तयार करीत आहे.पोलिसांनी कारवाईची तयारी चालविली असताना आता जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनीही तक्रारी नोंदविण्याचे आवाहन केले आहे. वर्धन ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, गेल्या काही महिन्यात आपण १४ ते १५ सावकारांवर एफआयआर नोंदविले आहेत. या कारवाईसाठी संबंधिताची लेखी तक्रार असणे आवश्यक आहे. स्वत:हून फिर्यादी बनून कारवाईची तरतूद कायद्यात नाही. त्यामुळेच सावकारांकडून फसवणूक झालेल्यांनी जिल्हा उपनिबंधक अथवा तालुक्याच्या सहायक निबंधक कार्यालयाकडे बिनधास्त तक्रारी कराव्या, त्यावर योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आवाहन उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे. पोलिसांपाठोपाठ सहकार प्रशासनानेही कारवाईची तयारी दाखविली असली तरी दंडाधिकारीय अधिकार असलेल्या महसूल तसेच प्राप्तीकर खात्याला अद्यापही अवैध सावकारांवर कारवाईचा मुहूर्त सापडला नसल्याचे दिसते.यवतमाळ शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध सावकारीत दोन टक्क्यापासून सुरू होणारा व्याजाचा दर हा ४० टक्क्याच्याही पुढे पोहोचला आहे. एक सावकार तर चक्क दहा दिवसाचे दहा टक्के असा व्याजदर लावतो आहे. लोकांना दाखविण्यासाठी व्यवसाय एक आणि प्रत्यक्षात त्याआड सावकारी असे चित्र यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी पहायला मिळते. दुकान एकाचे आणि उलाढाल भलत्याचीच असा कारभार राजरोसपणे सुरू आहे. यातूनच गोरगरिबांचा आर्थिक छळ व पिळवणूक केली जात आहे. प्रशासनातील महसूल, सहकार, पोलीस, प्राप्तीकर, विक्रीकर अशा विविध विभागांनी या अवैध सावकारांच्या मुसक्या आवळणे अपेक्षित आहे. मात्र तक्रार नाही, असे म्हणून कारवाई टाळली जात आहे. ते पाहता प्रशासनातील यंत्रणेचेही या सावकारांशी लागेबांधे नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे.जीएसटीची भीती दाखवून कच्च्या पावतीवर व्यवहारबाजारपेठेतील वेगवेगळ्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध कारभार चालतो. जीएसटीच्या नावाने कायम बोंबा मारणाºया या व्यापाºयांचे अनेक व्यवहार रेकॉर्डवर येतच नाही. कित्येक व्यवहार तर कच्च्या पावतीनेच चालविले जातात. पक्की पावती मागितल्यास जीएसटी लागेल, अशी भीती ग्राहकांना दाखविली जाते. अशा व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून हाच पैसा अवैध सावकारीत गुंतविला जात आहे. विविध क्षेत्रातील मंडळी अवैध सावकारीच्या व्यवसायात ‘फायनान्सर’ म्हणून नावारुपास आली आहे. ब्रेक लावण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेपर्यंतही अवैध सावकारीतील लाभाचे पाट तर पोहोचले नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.डॉक्टरही फायनान्सरच्या भूमिकेतविविध व्यवसायाआडून अवैध सावकारीमध्ये पैसा उपलब्ध करून दिला जात आहे. त्यात आता डॉक्टरही मागे नाहीत. यवतमाळ शहरातील अशाच काही डॉक्टरांची नावे अवैध सावकारांच्याच चर्चेतून पुढे आली आहे. हे डॉक्टर शहरातील अवैध सावकार, बिल्डर, रियल इस्टेट या व्यवसायासाठी फायनान्सर म्हणून भक्कमपणे उभे राहत आहेत. कुणी संपत्ती खरेदी केली आहे तर कुणी बारमध्ये दरबार भरवितो आहे. काही डॉक्टरांनी शहरातील अगदी क्रीम जागा ताब्यात घेतल्या आहेत. एका डॉक्टरने तर आपल्या दवाखान्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बिल्डरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये अवैध सावकारी व रियल इस्टेटमध्ये गुंतविले आहेत. येथील प्राचीन मंदिर रोड व परिसरातील डॉक्टर मंडळींची अवैध सावकार व बिल्डरांकडे सर्वाधिक उठबस राहत असल्याचे सांगितले जाते. या डॉक्टर कम फायनान्सरवरसुद्धा सहकार, पोलीस, प्राप्तीकर, महसूल असे शासनाचे विविध विभाग मेहेरबान असल्याचे दिसून येते. या डॉक्टरांच्या व्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, एवढे निश्चित.