कारच्या काचा फोडल्या : पांढरकवडातील परिवाराची तक्रार कळंब : दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लगतच्या दत्तापूर टेकडीवर लुटल्याची घटना शनिवारी दुपारी ५ वाजता घडली. कारच्या काचा फोडून महिलेच्या पर्समधील दीड हजार रुपये लांबविले तर दागिनेही पळविण्याचा प्रयत्न झाला. तोंडावर काळे कापड बांधून अर्धनग्न असलेल्या दोघांनी हा प्रकार केला. प्रकरणी सायंकाळी कळंब पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. पांढरकवडा येथील एक कुटुंब कळंबलगतच्या दत्तापूर टेकडीवर दर्शनासाठी आले होते. त्याच वेळी तेथे दोन तरुण आले. त्यांनी काठी, दगड आदी वस्तूंनी कारच्या काचा फोडल्या. त्याच वेळी कारमधील महिलेच्या जवळची पर्स हिसकावून घेतली. या कारमध्ये चार लहान मुले, एक दाम्पत्य आणि एक मोठा मुलगा होता. काय प्रकार होत आहे हे त्यांना कळलेच नाही. कशीबशी त्यांनी टेकडीवरून सुटका करून घेत कळंब पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी कारमधील सत्यनारायण नामक व्यक्तीने तक्रार नोंदविली. या टेकडीवर लुटमारीचे प्रकार वाढले आहे. (तालुका प्रतिनिधी)
दत्तापूर टेकडीवर भाविकांना लुटले
By admin | Updated: May 22, 2016 02:05 IST